बुधवार, २९ फेब्रुवारी, २०१२

मंत्रालय लोकशाही दिन सोमवार 5 मार्च रोजी


मुंबई, दि. 28 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोमवार दिनांक 5 मार्च 2012 रोजी सकाळी 11.00 वाजता मंत्रालय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
या दिवशी ज्या अर्जदाराने अर्जाच्या प्रपत्राच्या नमुन्यानुसार अर्जाची आगाऊ प्रत व त्यासह आवश्यक कागदपत्राच्या प्रती जोडल्या असतील अशाच अर्जदाराला मंत्रालयात लोकशाही दिनामध्ये मुख्यमंत्र्यांना समक्ष निवेदन देण्यासाठी सोडण्यात येईल,
0 0 0 0 0

राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन हातमाग हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक - नसीम खान


मुंबई,‍िद. 28 : हातमाग आणि हस्तकलेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या अनेक कलाकुसरींनी भारतीय संस्कृती समृद्ध केली तर हातमाग हे देशाच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. त्यामुळे हा वारसा जतन करणे गरजेचे आह, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी केले.
वांद्रे येथील रेक्लेमेशन मैदानात सुरु असलेल्या राष्ट्रीय हातमाग प्रदर्शन-2012 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाटेक्सचे अध्यक्ष . पु. चिंताकींदी, उपाध्यक्ष . . आसई, वस्त्रोद्योग संचालक आर. एन. शिनगारे, महाटेक्सचे कार्यकारी संचालक सु. . कुरसंगे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. खान यांनी यावेळी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सची पाहणी केली आणि हातमाग निर्मितीचे  प्रात्यक्षि पाहिले.
केंद्र शासनाचे विकास आयुक्त (हातमाग) यांचे कार्यालय राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघाच्या (महाटेक्स) यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 18 मार्च पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातील विविध भागातील हातमाग संस्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. हे प्रदर्शन दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. सुट्टीच्या दिवशी मात्र हे प्रदर्शन दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहील.
देशभरातील गरीब विणकरांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करुण देणे, देशाच्या विविध भागातील हातमाग उत्पादने ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध करुन देणे तसेच हातमागाचे कपडे आणि डिझाईनविषयी जनजागृती करणे आदी विविध उद्दीष्टे या प्रदर्शनाच्या आयोजनामागे आहेत. प्रदर्शनात देशातील 14 राज्यांतील 75 संस्थांचे स्टॉल्स असून सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य महोत्सव आणि पारंपरिक हातमाग वस्त्रांचे फॅशन शो आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
देशभरातील नावांजलेली उत्पादने येथे पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी उपलब्ध असून त्यात महाराष्ट्रातील येवल्याची पैठणी, नारायण पेठ कॉटन, नारायण पेठ सिल्क, रकली सिल्क, सोलापूरी चादरी, पुणेरी साडी ड्रेस मटेरिअल उपलब्ध आहेत तर उत्तर प्रदेशमधील झब्बा - पायजमा, चिक साडी. मध्य प्रदेशमधील चंदेरी, माहेश्वरी साड्या, आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली, पटोला साड्या, तामिळनाडूतील सुंगडी, राजस्थानची बांधणी, कोलकत्त्याची कलकत्ता कॉटन तसेच सिल्क साडी, गुजराथमधील रजई, कोटा साडी, बिहारची टसर सिल्क साडी, शर्टींग, हरयाना-पानिपतच्या प्रिंटेड बेडशिट, ब्लँकेट, मणिपूरी शॉल, झब्बा, काश्मिरी पशमिना शॉल, दिल्लीचे वुलन कॉटन कारपेट तसेच ओरीसी संबळपूरी सिल्क साडी, सिल्क ड्रेस मटेरीयल इत्यादी दर्जेदार उत्पादने या प्रदर्शनात उपलब्ध आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार जाहीर


मुंबई , दि. 28 : महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन स्पर्धेचे सन 2011-12 यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  नाशिक जिल्ह्यातील डॉ.बाबासाहेब  आंबेडकर पाणी वापर संस्थेस सात लाख रुपयांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या पाणी वापर संस्था
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी वापर संस्थेला (वाघाड प्रकल्प, नाशिक प्रदेश) सात लाख रुपयांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार तर याच प्रकल्पावरील मोहाडी येथील नवनाथ पाणी वापर संस्थेला पाच लाख रुपयांचा द्वितीय राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तीन लाख रुपयांच्या तृतीय राज्यस्तरीय पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कै. दादासाहेब पाटील पाणी वापर सहकारी संस्था मर्यादित (जायकवाडी प्रकल्प, औरंगाबाद प्रदेश) या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
प्रदेशस्तरीय विभागातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या तीन व दोन लाख रुपयांच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या पाणी वापर संस्था अनुक्रमे पुढीलप्रमाणे.
नाशिक - मनकर्णा पाणी वापर संस्था, पालखेड, ता. निफाड, जि. नाशिक, ओझरखेड प्रकल्प
                बाणेश्वर पाणी वापर संस्था, आंबेदिंडोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक, वाघाड प्रकल्प.
पुणे - तात्यासाहेब कोरे वारणा प्रकल्पीय पाणी वापर संस्था, मनपाडळे, ता.हातकणंगले,
                जि. कोल्हापूर, मनपाड लघु पाटबंधारे प्रकल्प.
               कानिफनाथ पाणी वापर संस्था, क्रमांक 55, चोंभूत, ता. पारनेर, जि. अहमदनगर,  कुकडी  प्रकल्प.
कोकण-   देवगांगेश्वर पाणी वापर संस्था, तिथवली, ता. वैभववाडी, जि. सिंधुदूर्ग, तिथवली लघु पाटबंधारे
                प्रकल्प.  रिध्दीनाथ पाणी वापर संस्था, वेल्होळी, ता. शहापूर, जि. ठाणे, वेल्होळी लघु पाटबंधारे 
                प्रकल्प.
अमरावती  - डॉ. शरद पाणी वापर संस्था, ता. वरुड, जि. अमरावती, नागठाणा लघु पाटबंधारे  प्रकल्प.  
                     गंगोत्री पाणी वापर संस्था, इसंब्री, ता. वरुड, जि. अमरावती, शेकदरी लघु   पाटबंधारे प्रकल्प.
औरंगाबाद-  अडभंगनाथ पाणी वापर सहकारी संस्था मर्यादित, भांबेरी , ता. अंबड, जि. जालना,  जायकवाडी
                     प्रकल्प. कृष्णा कालवा वाटप सहकारी संस्था मर्यादित, मालेगांव, ता. अर्धापूर, जि. नांदेड,  
                     पुर्णा  प्रकल्प (वसमत नगर).
नागपूर-       साईबाबा पाणी वापर संस्था, अंतरजी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली, इटियाडोह प्रकल्प. राजीव
                  गांधी  पाणी वापर सहकारी संस्था मर्यादित, सिल्ली (अंबाडी) ता. जि.भंडारा, सिल्ली (अंबाडी)
                   लघु टबंधारे प्रकल्प.
            राज्याच्या जलनितीनुसार सिंचन व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असावा, सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन व्हावे म्हणून यात कायद्याचे पाठबळ देण्यासाठी  महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन, कायदा 2005 करण्यात आला. सहभागी पाणी वापर संस्थांचे सिंचन यशस्वी व्हावे, व्यवस्थापन कार्यक्षम असावे व संस्था स्वबळावर सुदृढ व्हाव्यात यासाठी पाणी वापर संस्थांच्या व्यवस्थापनाकरिता महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष आहे.
हा शासन निर्णय 24 फेब्रुवारी 2012 रोजी प्रसिध्द करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याचा संगणक सांकेतांक 20120224085649249001 असा आहे.

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१२

बालकामगार प्रथा निर्मूलनासाठी लोकसहभाग आवश्यक


बालकामगार प्रथा समाजाला लागलेला कलंक आहे. त्यांना शिक्षण देणे ही सामाजिक गरज आहे. रिबीमुळे शाळा शिकणारी मुले/मुली कामधंदा करुन अर्थाजन करतात. अशी मुल म्हणजेच बालकामगार होय. बालवयात त्यांना धोकादायक उद्योग व्यवसायात कामावर ठेवता त्यांची शारीरि मानसिक वाढ होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बालकामगार प्रथेचे संपूर्णपणे निर्मूलन होणे गरजेचे आहे. यासाठी बालकामगारांना शिक्षण देणे हाच पर्याय आहे.
बालकामगार निर्माण होण्यास आई वडिलांचे अडाणीपण, अज्ञान, अशिक्षितपणा, व्यसन, दारिद्र्य आदी बाबी कारणीभूत असतात. घरात खाणारी वाढती तोंडे पालकांच्या व्यसनामुळे स्वत: मुलांना घर चालविण्यासाठी अर्थाजन करावे लागते. काही मुले घरी चालू असलेले काम म्हणजेच लोहारकाम, सोनारकाम, शेती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन अशी पारंपरि कामे करतात. गाढवावरुन माती वाहून नेणे, विडीकाम, वस्त्रोद्योग, घरकाम, विटभट्टीवर, बांधकाम, हॉटेल, कचर/भंगार वेचणे अश अनेक धोकादायक उद्योगात ही मुले काम करतात. काही मुलं कारखान्यात काम करतात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.
शिक्षणासाठी येणारा खर्च पालकांना परवडणारा नसतो. रोजची कमाई घरखर्चावर तसेच व्यसनावर खर्च होत. अनेक मुले कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून निरनिराळ्या वस्तू पुनर्प्रक्रियेसाठी गोळा करतात. सतत घाणीत काम करुन त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
समाजामध्ये बालमजूर हा अत्यंत उपेक्षित घटक आहे. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, शिक्षण घ्यायचे त्या वयात या मुलामुलींना धोकादायक उद्योगात काम करावे लागते. यामुळे लाखो मुलांचे जीवन कोमेजून जात आहे. ज्या उद्योग, व्यवसायामध्ये बालमजरांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणच्या बालकामगारांना कामापासून परावृत्त करुन त्यांचे योग्य पध्दतीने शैक्षणिक पुनर्वसन घडवून आणण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशिल आहे.
बालकामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. बालकामगारासाठी विशेष शाळा चालविल्या जात आहेत. बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य वेगात सुरु आहे.  त्यांना  शासनाकडून  शैक्षणिक व्यवसाय प्रशिक्षण, साहित्य, गणवेश, विद्यावेतन, मध्यान्ह भोजन पुरविण्यात येते. बालकामगारांना शाळेच विशेष  गोडी लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मुलांनी एका ठिकाणी बसावे, अंकांची, अक्षरांची ओळख व्हावी यासाठी आनंददायी वातावरण निर्मिती विशेष शाळेतील कर्मचारी करतात. मुलांच्या कलाने शिकवितात. गाणी, गोष्टी, देशभक्तीपर गीते, परिसरातील माहिती दिली जाते. विविध सण दिनविशेष शाळेत साजरे केले जातात. त्यांचे हरविलेले बालपण मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत.
 धोकादायक उद्योग/व्यवसायात काम करणाऱ्या बालकामगारांना या विशेष शाळेत प्रवेश देण्यात येतो. यासाठी शासनामार्फत बालकामगारांच सर्वेक्षण करण्यात येत. बालकामगार शिक्षणापासून वंचित असतात. त्यांच्या घरी परिसरामध्ये शिक्षणाचे, स्वच्छतेचे वातावरण नसते. त्यामुळे त्यांच्यावर याबाबतीतील संस्कार करुन, शिकण्याची गोडी लावून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.
बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आजची ही लहान मुले द्याच्या भारताचे भविष्य आहे. ज्‍ज्वल भारताच्या भविष्यासाठी या मुलांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी हवी सर्वांची साथ.