बुधवार, ४ एप्रिल, २०१२

शालेय शिक्षण विभागाने प्रलंबित प्रकरणांची संख्या शून्यावर आणण्यासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घ्यावा --राजेंद्र दर्डा


मुंबई, दि. 3 : शालेय शिक्षण विभाग अधिक गतीमान आणि कार्यक्षम होण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणाचा आढावा घ्यावा तसेच विभागातील प्रलंबित प्रकरणांची संख्या शून्यावर आणण्याचा कालबध्द कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज येथे केले.
            शालेय शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत श्री. दर्डा बोलत होते. यावेळी अपर मुख्य सचिव जे. एस. सहारीया उपस्थित होते.
            श्री.दर्डा पुढे म्हणाले की, शालेय शिक्षण विभाग हा शालेय विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संबंधित असल्यामुळे अत्यंत संवेदनशील आहे. हा विभाग लोकाभिमुख व्हावा यासाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांचा अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करुन ते चांगल्या प्रकारे राबविले जातील याची दक्षता घेतली पाहिजे. राज्यातील शालेय शिक्षण दर्जेदार व्हावे यासाठी देशातील इतर राज्यातील शिक्षण प्रक्रिया कशा पध्दतीने राबविल्या जातात याचा तुलनात्मक अभ्यास विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केला पाहिजे. प्रशासनातील सत्तेचे विक्रेंद्रीकरण होऊन जे अधिकार संचालक, उपसंचालक, शिक्षण अधिकारी यांना देण्यात आले आहेत त्यांचा पूर्णपणे वापर झाल्यास लोकांच्या तक्रारीचे निवारण क्षेत्रिय स्तरावर होईल. मनुष्यबळाची पुरेशी उपलब्धता नसतानाही हा विभाग चांगले काम करीत आहे. विभाग अधिक सक्षम करण्यास या कार्यशाळेचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास श्री. दर्डा यांनी यावेळी व्यक्त केला.
            विभागातील विविध योजनांचा कालबध्द आर्थिक भौतिक आढावा घेऊन केंद्र सरकारकडील प्रकरणांचा व्यक्तीश: पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करतानाच प्रशिक्षण संगणकाद्वारे  कामकाज गतिमान करण्याची गरज अप्पर मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांनी यावेळी व्यक्त केली.
            माहिती अधिकाराचा कायदा विचारात घेता, कर्मचाऱ्यांना मुद्देसूद टिप्पणी लेखनाचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांचे सहसचिव शेखर गायकवाड यांनी सांगितले.
            या कार्यशाळेत शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
000

हॉकी स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार


     मुंबई, दि. 3 : ब्रिजस्टोन वर्ल्ड सिरीज हॉकी चॅंम्पियन्स स्पर्धेतील विजेत्या शेर--पंजाब संघाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते चषकाचे वितरण करण्यात आले.
        महिंद्रा स्टेडियम येथे काल सायंकाळी शेर--पंजाब पुणे स्ट्रायकर्स यांच्या दरम्यान हॉकी सामना झाला. यात शेर--पंजाब संघ विजेता ठरला. संघाचा कप्तान प्रबज्योत सिंग याने मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यावेळी केद्रीय क्रिडा मंत्री अजय माकन, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण, अभिनेता सुनिल शेट्टी, बालकृष्णन, आर. के. शेट्टी, हरिष तिवानी,         प्रशांत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री     श्री. माकन यांच्या हस्ते खेळाडूंचा गोरव करण्यात आला.
000

लावणी महोत्सवाच्या माध्यमातून लोककलेला राजाश्रय मिळवून देण्याचा प्रयत्न - संजय देवतळे


मुंबई, दि. 3 : महाराष्ट्राची लोककला सर्वत्र पोहोचावी, कलावंतांना प्रोत्साहन व्यासपीठ मिळावे, आणि लोककलेला राजाश्रय मिळावा या उद्देशाने लावणी महोत्सवाचे आयोजन राज्य शासन री असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांनी येथे सांगितले.
          राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे एनसीपीएच्या टाटा नाटयगृहात आयोजित केलेल्य तीन दिवसीय लावणी महोत्सवाच्या द्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, ग्रामविकासमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री सुनी तटकरे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे, आमदार श्रीमती ॲनी शेखर, विक्रम काळे, सुभाष झनक आदी उपस्थित होते.
          यावेळी ज्येष्ठ लोककलावंत सरलाबाई नांदुरेकर, कांताबाई बेलोरेकर, शकुंतलाताई नगरकर, मंगला कुडारकर यांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. निवड समितीच्या सदस्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
          पहिल्या दिवशी वैशाली नगरकर, वैशाली सुवर्णा कोल्हापूरकर, जय अंबिका कलाकेंद्र सणसवाडी यांनी लावणी सादर केली. 'मी निघाले निघाले बाजाराला, 'भर बाजारी जाता जाता, अशा एका पेक्षा एक  लावणी यावेळी सादर करून रसिकांची मने जिंकली. उद्या 4 एप्रिल रोजी अंबिका संजिवनी लखनगावकर, राणी सीमा खांडवीकर, सणसवाडी, आर्यभूषण थिएटर्स, पुणे हे कला पथक आपली कला सादर करणार आहेत.
000