मंगळवार, ६ मार्च, २०१२

मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते नैसर्गिक रंगाच्या स्टॉलचे उदघाटन


मुंबई, दि. 5 : पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व  पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक रंगाच्या स्टॉलचे  उद्घाटन पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते  आज  मंत्रालयात करण्यात आले.
या स्टॉलला  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री सचिन अहिर, पर्यावरण सचिव, वल्सा नायर सिंह,  पर्यावरण विभागाचे संचालक,
डॉ. पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे  जनसंपर्क  अधिकारी  संजय भुस्कुटे आदि मान्यवर उपस्थितीत होते.
पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यासाठी नैसर्गिक रंगाची गरज लक्षात घेऊन, मंत्रालयात नैसर्गिक रंगांच्या विक्रीचा स्टॉल  उभारण्यात आलाआहे. या स्टॉलवरच्या रंगाची विक्री  इको क्लबचे  विद्यार्थी करत आहेत.  हे  नैसर्गिक रंग इको एक्झिट, पुणे या सामाजिक संस्थेच्या वतीने बनविण्यात आले आहेत.
0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा