खास लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खास लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

ई-लोकशाही प्रणाली व नागरी सुविधा केंद्र


तुम्हाला सातबारा हवा आहे का ?, सेतु सुविधा केंद्रातील कोणताही दाखला हवा असल्यास, रेशन व्यवस्थित मिळत नसल्यास यासह विविध ३९ प्रकारच्या तक्रारी तुम्हाला घरबसल्या करता येणार आहेत. तर आता शासकीय कार्यालयात न जाता ही मागणी करता येणार आहे. आपला मोबाईल उचला ०२२-२७५७५९२० या क्रमांकावरती आपली तक्रार नोंदवा अथवा घरात इंटरनेट असेल तर http://kokandivision.com/ elokshahi या लिंक वर जा आणि तक्रार नोंदवा तुमच्या तक्रारीची दखल घेवून तुमचे काम त्वरीत होणार आहे. यामुळे तुम्हाला शासकीय कार्यालयात जायची गरज पडणार नाही . तसेच तुम्हाला सर्व विभागातील योजनांची माहिती लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच ठिकाणी मिळणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत ई- लोकशाही व नागरी सुविधा केंद्राची सुरूवात कोकण विभागात सर्वप्रथम करण्यात आली आहे. ई- लोकशाही दिनाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मालवण येथील रामभाऊ पांगे व दोडामार्ग येथील सुर्यकांत परमेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार सी.श्री.उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त डी.एस.डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी आर.एस.बर्गे, उपजिल्हाधिकारी प्रशासन अरविंद वळंजू, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.गणेश मुळे तसेच यावेळी प्रांताधिकारी सर्व तहसिलदार, विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकशाही प्रक्रिया अधिक गतीमान व सुविधाजनक होण्यासाठी ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व विभागातील योजनांची एकत्रित माहिती मिळण्यासाठी नागरी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे.नागरी सुविधा केंद्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय अंतर्गत सर्व योजनांची एकत्रित माहिती मिळणार आहे.

ई-लोकशाही अंतर्गत नागरिक आपल्या निवास अथवा कोणत्याही ठिकाणाहून मोबाईल अथवा इंटरनेटवरून आपली तक्रार, निवेदन शासकीय यंत्रणेकडे दाखल करू शकतात. प्रायोगिक तत्वावर मोबाईलव्दारे ०२२-२७५७५९२० या क्रमांकावर तर इंटरनेटवर http://kokandivision.com/ elokshahi या वेबसाईटवरमध्ये तक्रार नोंद‍विता येणार आहे. या योजनेत सध्या काही त्रुटी असू शकतात. या संदर्भातील शंका अथवा त्रुटी जिल्हाधिकारी कार्यालयास लोकांनी कळवाव्यात. त्याची दखल घेतली जाईल असेही जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले.

पुणे येथील न्यू इंडिक्ट्रन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमीटेडचे प्रतिनिधी अतुल लोंढे यांनी ई- लोकशाही प्रणालीविषयक माहिती व प्रशिक्षण उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले. तक्रार निवारण प्रणालीअंतर्गत सध्या १ जानेवारी पर्यंत ०२२-२७५७५९२० या क्रमांकावरती नागरिकांनी आपली तक्रार नोंदवायची आहे. प्रथम भाषा पर्याय येईल. नंतर जिल्हा पर्याय येईल. त्यानंतर विविध विभागांसाठी नंबर पर्याय येतील. या पर्यायानंतर ३ मिनीटांत आपली तक्रार मोबाईलव्दारे सांगावयाची आहे. ती टेप होणार असून तोच आवाज आपल्याला पुन्हा ऐकू येईल. आपली तक्रार योग्य आहे का ?, ती जर योग्य असेल तर १ नंबर दाबावा लागेल.तर पुन्हा तक्रारीमध्ये काही बदल असल्यास २ नंबर दाबून नव्याने तक्रार नोंदविता येईल. तक्रार योग्य असल्याची खात्री आहे व आपण १ नंबर दाबल्यास आपल्याला एक टोकन नंबर सांगण्यात येईल.जेणेकरून नागरिक आपल्या तक्रारीचा नंतर आढावा घेवू शकणार आहेत. मोबाईलव्दारे जर आपण तक्रार नोंदविली तर आपल्याला तक्रार नोंद झाल्याचा संदेश येईल.मात्र दूरध्वनी वरून ही प्रक्रिया केल्यास हा संदेश मिळू शकणार नाही.

अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा तसेच ऑनलाईनसाठी ही याच प्रकारे संबधित तक्रारीचा मेसेज त्या विभागाकडे जाणार आहे.संबधित तक्रारी सात दिवसाच्या आत त्या त्या विभागाकडे जाणार असून त्याचे निराकरण ७ दिवसांच्या आत झाले नाही तर या तक्रारीचा संदेश वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार आहे.व सर्व तक्रारींचे निराकरण तात्काळ करण्यात येणार आहे.

ग्रंथोत्सव धुळेकरांसाठी ठरली एक पर्वणी !

गतिमान युगात आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या क्रांतीमुळे जी गती निर्माण झाली आहे.त्यात आपण स्वत: कुठे आहोत याबाबत माणूस स्वत:ला विसरत चालला आहे.अशा परिस्थितीत ग्रंथ हाच गुरु ही चळवळ नव्यानं उभी राहत असून वाचनाची आवड अनेकांना असते, मात्र काय वाचावं, कसं वाचावं, किती वाचावं हे प्रश्न अनेक वाचकांना नेहमीच सतावत असतात आणि त्यातच वाचन संस्कृतीचा वाचक कुठे तरी भरकटतो.

अशा भरकटलेल्या आणि गोंधळात सापडलेल्यांसाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रंथोत्सव २०११ हा उपक्रम जिल्हा माहिती कार्यालय, धुळे या कार्यालयाने दि. १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर, २०११ या कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिरात आयोजित केला होता. या ग्रंथोत्सवास मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला .

वाचाल तर वाचाल हे वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, आजच्या युगात माहिती आणि त्यातून मिळणारा नवा संदेश आपल्या जीवनात किती महत्वाचा आहे.याबाबत माणूस वाचन करताना विरंगुळा म्हणून वाचन करतो तो भाग वेगळा आणि स्वत:ला अद्यावत ठेवण्यासाठी आणि आजच्या युगात स्पर्धेत टिकून राहतो तो भाग वेगळा. वाचनातून मिळणारी माहिती, विचार, माणसाला प्रगल्भता देतात हे सांगणे नवं नाही. कारण जी माणसं सर्व अर्थानं मोठी झाली त्यांच्या चरित्रात वाचनातून मिळालेला विचारच त्यांना मोठं करण्यात समर्थपणे कामी आला असं त्यांच्या शब्दात त्यांनी लिहून ठेवलं.

वाचणारा माणूस अनेक महत्वाचे संदर्भ बोलू शकतो, लिहू शकतो आणि नवा विचार मांडून साहित्यातून समाजाला दिशा देण्याचं काम करू शकतो. साहित्य निर्मिती ही स्‍वत:ची कधीही नसते ती लोकांची होत असते. कोणी काय लिहीलं ती उत्सुकता वाचकांना असते. आणि घरटयात पिलांनी वाट पहावी तशी वाचक मंडळी साहित्यीकानं नवं काय लिहीलं यासाठी आसुसलेली असते. त्यातूनच वाचन संस्कृती निकोप तर होत जाते पुन्हा समृध्द होत जाते.

व्यक्तीसापेक्ष साहित्यिकांची विचारधारा स्विकारणे, नाकारणे हे वाचकांवर अवलंबून असते. म्हणून साहित्य कोणतेही असो त्याचा वाचक त्या-त्या पातळीवर स्वत:ला जे हवे ते घेवून समृध्द होण्यासाठी झपाटलेला असतो. कोणत्याही देशाची, त्याचप्रमाणे राज्य असेल, शहर असेल किंवा गाव असेल त्या गावाची समृध्दी तिथे असलेली माणसं कोणते ग्रंथ वाचतात, वाचनालय किती समृध्द आहे यावरुन मानली जाते कारण ग्रंथ हे समाजसुधारण्याचे ,समाजाला दिशा देण्याचे काम त्या-त्या विषयातून करत असतात.गावागावात पारायण ही संस्कृती जरी अध्यात्मिक असली तरी सार्वजनिक वाचन ही संकल्पना वाचन संस्कृतीशी जोडलेली आढळते. अशा विविधांगी विषयातून माणसं समृध्द होतात. ती ग्रंथ वाचनातून हे सांगणे न लगे.

वाचन संस्कृतीची जोपासना, वाचनाची समृध्दी, वाचक घडवण्याची प्रक्रिया, वाचनातून व्यापक जीवनदर्शन निर्माण झालेल्या महान कलाकृती, सर्वंकष वाचन, आत्मशोध, ज्ञानविश्व, संत साहित्य, स्त्री-स्वातंत्र्य, समग्र परिवर्तन, ग्रामीण जीवन, पुराणकथा, बालवाड़मय, कथा, कविता, कादंबरी, नाटक, वेब विश्व, विज्ञान, इतिहास या सार्‍या गोतावळयात ग्रंथ आमच्यासाठी आम्ही ग्रंथासाठी अशी नाती भक्कमपणे निर्माण करण्याची प्रक्रिया समर्थ करण्यासाठी हा ग्रंथ महोत्सव झाला.

तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, वृध्दांनी, महिलांनी आणि समर्थ वाचन संस्कृतीच्या प्रक्रियेत राहणार्‍यांनी या ग्रंथोत्सवात यशस्वी सहभाग नोंदविला. प्रत्येक गोष्ट माणूस विसरत चालला आहे. तेव्हा मातृदिन, बंधुदिन, प्रेमदिन असे अनेक दिवस साजरे होवू लागले आहेत. ग्रंथ हा शेवटचा माणूस जिवंत असेपर्यंत निर्माण होत राहणार आणि पुढचा येणारा वाचत रहाणार म्हणून ही संस्कृती कधीही नष्ट होणार नसली तरी नवनवीन आव्हानं समोर असताना घरात एक हक्काचं आपलं कोणीतरी असावं, जे सर्वकाळ साथ देतं आणि जीवनात अनेक वेळा मार्गदर्शक ठरतं ते एकमेव साधन म्हणजे आपला ग्रंथ होयं. या ग्रंथाशी नव्यानं नातं जोडावं. अशी भावना ! माणसाला समृध्द करण्यासाठी ग्रंथांनी जे दिलं त्याचा विसर कोणालाही पडू नये त्यासाठी धुळे येथील ग्रंथमहोत्सव पर्वणी ठरली !

ग्रंथोत्सवाच्या दि. १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या ग्रंथदिंडी, ग्रंथोत्सव कार्यक्रम, शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील आणि मंडळी यांचा रंग शाहिरी कलेचा कार्यक्रम, कवी सम्मेलन तसेच प्रथितयश लेखकाची प्रकट मुलाखतीत प्रा.अनिल सोनार, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद,धुळे जिल्हा यांची श्री. चंद्रशेखर पाटील, संचालक, मी महाराष्ट्र वाहिनी, धुळे यांनी साहित्य क्षेत्रावर आधारित घेतलेली प्रदीर्घ मुलाखत आदि बहारदार कार्यक्रमांचा साहित्य प्रेमी, कवी-कवयित्री, रसिक, नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला.

धुळे येथील ग्रंथोत्सवात जिल्हयातील साहित्य प्रेमी, रसिकांनी शासकीय ग्रंथालय आणि खाजगी ग्रंथालय धारकांकडून संत, वाड.मय, ललित लेखकांची पुस्तकांची मोठया प्रमाणात खरेदी करुन ग्रंथस्टॉल धारकांना मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला हे विशेष.


  • जगन्नाथ पाटील 
  • मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

    मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्य संपादक बाळशास्त्री जांभेêकर


            6 जानेवारी 1832 साली मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र  ‘दर्पण’  सुरु झाले. या घटनेला आज जवळपास 180 वर्षे झाली. बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर दर्पणचे संपादक होते. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र काढून मराठीतील `आद्य संपादक` होण्याचा बहुमान मिळविला.  अर्थातच मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणूनच बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख करावा लागतो.  त्यांच्या या महान कार्याचा अभिमान वाटतो, म्हणूनच 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.  आद्य संपादक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या महनीय कार्याची ही थोडक्यात ओळख.


            भारतातील पहिले वृत्तपत्र जेम्स् हिकी यांनी 29 जानेवारी 1780 रोजी बेंगॉल  गॅझेट अथवा कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायजर या नावाने सुरु केले होते. हिकीच्या पत्रावर A weekly political and  commercial paper open to all parties but influenced by none.अशा ओळी असत म्हणजेच साप्ताहिक सर्वांसाठी खुले पण निर्भय असावे, अशी भूमिका होती. हिकीच्या नंतर जवळपास 50 वर्षांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलेल्या दर्पण मध्ये त्यांनी हेच तत्त्व पाळले
    क्रांतीकारी घटना
            वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी एक ऐतिहासिक क्रांतीकारक पाऊल उचलून बाळशास्त्रींनी संपूर्ण मराठी वृत्तपत्रसृष्टीवर आपल्या कार्याचा ठसा उमटविला. ती ऐतिहासिक घटना म्हणजे बाळशास्त्रींचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण. या घटनेमुळे मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर ओळखले जाऊ लागले. केवळ दर्पण हे पहिले वृत्तपत्रच नव्हे, तर त्यांनी दिग्दर्शन हे पहिले मासिकही सुरु केले. बाळशास्त्रींचा जन्म सिंधुदुर्ग जिल्हयाच्या देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या खेडेगावात 1812 साली  झाला.            
    वृत्तपत्राचे सामर्थ्य
            हिकीच्या वृत्तपत्रातून जे स्वातंत्र्य अपेक्षित होते, ते स्वातंत्र्य फक्त इंग्लंडमधील वृत्तपत्रांना होते. आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी इंग्रज कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. भारतातील जनतेबद्दल अथवा त्यांच्या त्रासाबद्दल त्याला काही देणे-घेणे नव्हते. मात्र बाळशास्त्रींची दृष्टी अत्यंत व्यापक असल्याने त्यांनी मुद्रणकलेचे क्रांतीकारत्व हेरले. या कलेचा संपूर्ण परिचय करुन घेतला. वृत्तपत्रांचे सामर्थ्य त्यांनी ओळखले आणि दर्पणद्वारे समाजाला आरसा दिला. पहा! आपले प्रतिबिंब आणि मगच ठरवा, असा संदेश दिला. वृत्तपत्र हे ज्ञान-विज्ञान यांच्या प्रसाराचे मुख्य साधन आहेच. परंतु समाजाची सार्वजनिक नितिमत्ता सुधारणे, जनतेत जागृती निर्माण करण्याचे काम वृत्तपत्राचे आहे, हे बाळशास्त्रींनी दर्पणद्वारे लोकांच्या मनावर बिंबवलं.
    पहिला महापुरूष
                इंग्रजांच्या काळातील लोकांसमोर हे राज्य म्हणजे आपल्याला घातक, मारक, की तारक? अशी संभ्रमावस्था झाली होतीमात्र काही विचारवंतांच्या मनात एक वेगळेच वादळ निर्माण होऊन विचारांचा जोरदार प्रवाह तयार झाला होताजे आहे, जे नाही त्यातच आहेम्हणून लोक त्याकडे आकर्षिले जात आहेत, याची जाणीव त्यांना झाली .समाजाला जागृत करायलाच पाहिजे, स्वत्वाची जाणीव निर्माण झालीच पाहिजे, असा विचार ज्या मंडळीच्या मनात आला, अशा पैकीच एक बाळशास्त्री होते. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी आपले राज्य जाऊन इंग्रजांचे राज्य का आले, याचे अचूक निदान करणारा महाराष्ट्रातील पहिला महापुरुष म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, असे म्हटले आहे.                                                                                                 
                इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करुन विविध विषयांचे ज्ञान मिळवून त्याचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल, याकडे त्यांचा ओढा होता. अगदी वयाच्या अकराव्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करुन जांभेकरांनी मुंबई गाठलीइंग्रजीचे ज्ञान आत्मसात केलेमराठी, संस्कृत, इंग्रजी, बंगाली, कानडी, पारसी, गुजराती अशा नऊ भाषांवर त्यांची चांगलीच पकड होतीपुढे 1834 साली त्यांची नियुक्ती मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झालीते पहिले नेटिव असिस्टन्ट प्रोफेसर ठरले. पितामह दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी होते.
    दर्पण : एक ठिणगी
                आपल्या दर्पणमधून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजजागृतीचे जे कार्य केले, त्यातून समाजात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण झाली. आपल्या या वृत्तपत्र माध्यमाद्वारे त्यांनी एक ठिणगी पेटवलीआणि याच ठिणगीचा पुढे ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ अशा अग्रलेखाद्वारे लोकमान्यांनी भडका केलाभारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य ओळखू लागले,  ते या ठिणगीद्वारे, असे म्हटले तरी ते उचित ठरेल.
                दर्पणनंतर अनेक वृत्तपत्रे आली आणि प्रत्येक वृत्तपत्रातून दर्पणचेच प्रतिबिंब थोड्याफार प्रमाणातून जनतेच्या समोर आलेदर्पणचा काळ फारच कमी वर्षांचा ठरलाअगदी आठ वर्षाच्या काळात दर्पणने आपली कीर्ती सर्वत्र पसरविली आणि सर्वार्थाने मराठी वृत्तसृष्टीतील आद्य वृत्तपत्र म्हणून प्रसिद्ध झाले. आजही दर्पणचीच ठिणगी सर्वत्र पेटत आहे. हिकीचे बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र असे मानले तर बरोबर त्यानंतर 50 वर्षांनी बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतील पहिले वर्तमानपत्र दर्पण सुरु केलेजेम्स हिकीला 1780 मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीमधून काढून टाकले, तेव्हा त्याने आपले बेंगॉल गॅझेटियर सुरु केले होतेथोडक्यात त्याला काढल्यामुळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्याने वृत्तपत्र काढलेमात्र बाळशास्त्री जांभेकरांची भूमिका त्यापेक्षा कितीतरी वेगळी होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन जनतेला इंग्रज राजवटीच्या विरोधात उभे करण्याच्या दृष्टीने दर्पण काढले गेले.
    ग्रंथ निर्मिती
         मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832.  दिग्दर्शन या आद्य मराठी मासिकाचे संपादक 1837  1) बालव्याकरण 2) नितीकथा 3) सारसंग्रह 4) भूगोल विद्या 5) इंग्लड देशाची बखर भाग 1, भाग 2, 6) आल्फेड राजा 7) इंग्लड देश, अमेरिकन संस्थाने यामधील तंटा 8) मरे यांच्या इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप 9) शब्दसिध्दीनिबंध 10) हिंदुस्थानचा इतिहास 11) हिदुस्थानातील इंग्लिशांच्या राज्याचा  इतिहास  12) गणित शास्त्राचा उपयोगाविषयीचे संवाद 13) पुनर्विवाह प्रकरण 14) ज्ञानेश्वरी 15) शून्यलब्धिगणित 16) मानसशक्ती विषयीचे शोध असे विविध ग्रंथ बाळशास्त्रींनी लिहिले.                   
    विविध पुरस्कार
    दर्पणकारांना `जस्टिस ऑफ पीस` ही सन्मानाची उपाधी इंग्रजांनी देऊन त्यांचा गौरव केला होता. अक्कलकोट संस्थानचे युवराजगुरु, कुलाबा वेधशाळेचे ज्योतिर्निरीक्षक, आद्य भारतीय इतिहास संशोधक, मराठी भाषेचे चिकित्सक  शब्दकोशकर्ते अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
           बाळशास्त्री केवळ पत्रकार, उत्तम शिक्षक वा ग्रंथकार नव्हते, तर त्यांनी सरकारी नोकरीची बंधने साक्षेपाने सांभाळून देशोन्नतीच्या निरनिराळया चळवळींना चालना दिली. 17 मे, 1846 रोजी मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. 35 वर्षाच्या अल्प जीवनात त्यांनी  महान कार्य केलं. मनुष्य किती जगला, यापेक्षा तो कसा जगला, याला अधिक महत्त्व आहे. अन्यथा वटवृक्षापेक्षा चंदनाचे महत्त्व कधीच वाढले नसते, हे बाळशास्त्रींच्या जीवन कार्यातून दृष्टोत्पत्तीस आले आहे.