सोमवार, २ जानेवारी, २०१२

माहिती महासंचालक प्रमोद नलावडे यांची अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालयास भेट


अहमदनगर दि. 1- माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे नूतन महासंचालक श्री.प्रमोद नलावडे यांनी नुतन वर्षात अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालयास भेट देऊन कार्यालयीन कामकाजाची माहिती घेतली. श्री.नलावडे यांनी महासंचालक पदाची दि.31 डिसेंबर,2011 रोजी सुत्रे स्वीकारली आहेत. त्यानंतर जिल्हा माहिती कार्यालयास भेट देण्याचा हा त्यांचा पहिलाच दौरा होता.
        विभागीय माहिती उपसंचालक श्री.प्रसाद वसावे आणि जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार यांनी त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
        शासन सर्वसामान्यांसाठी राबवित असलेल्या विविध विकास योजनाची माहिती सर्व जनतेंना करुन देण्यासाठी माहिती जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती घेतली.
        माहिती उपसंचालक श्री.वसावे यांनी महासंचालक महोदयाना माहिती जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या वेबपोर्टल महान्युज, लोकराज्य मासिक, दिलखुलास, जय महाराष्ट्र, ईमेलद्वारे माध्यमांना देण्यात येणाऱ्या वृत्त,लेखांची तपशिलवार माहिती दिली. जिल्हा माहिती कार्यालये अधिक प्रभावी होण्यासाठी महासंचालक श्री.नलावडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. 
00000

प्रमोद नलावडे माहिती महासंचालक पदी रुजू




प्रमोद नलावडे (भा.प्र.से.) यांनी शनिवारी माहिती महासंचालक पदाचा कार्यभार प्रभारी महासंचालक राजेश अग्रवाल यांच्याकडून स्वीकारला. श्री.नलावडे हे १९९६ च्या भारतीय प्रशासन सेवेच्या तुकडीतील असून ते यापूर्वी मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा या विभागात सह सचिव या पदावर कार्यरत होते.

श्री.नलावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग, विक्रीकर सह आयुक्त नरिमन पॉईंट विभाग, विक्रीकर सह आयुक्त अन्वेषण विभाग, अपर विक्रीकर आयुक्त (आस्थापना) महाराष्ट्र राज्य अशा विविध पदावर उल्लेखनीय काम करुन आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.