धुळे, दि. 29 :- जिल्हा परिविक्षा समितीची प्रथम सभा
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील
सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, महानगरपालिका आयुक्त डॉ. नामदेव भोसले,
आयटीआयचे प्राचार्य अजय पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच.
नागरगोजे, समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य जालिंधर आडसुळे, कारागृह
अधीक्षक बी. आर. मोरे, प्र. जिल्हा
परिविक्षा अधिकारी श्रीमती एस. डी. परदेशी, परिविक्षा अधिकारी श्रीमती ए. व्ही.
पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, अपराधी
परिविक्षा अधिनियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांनी कार्यवाही करून
यापुढील सभेत प्रकरणांची माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच.
नागरगोजे यांनी समिती सदस्यांची माहिती, अपराधी परिविक्षा अधिनियम 1958 बाबतची
माहिती, अपराधी परिविक्षा नियम 1966 मधील नियम 32 मधील तरतुदी, परिविक्षा अधिकारी
यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या आदींची माहिती दिली.
अपराधी परिविक्षा अधिनियम 1958 व नियम
1966 ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णय दि.
27 एप्रिल, 2015 नुसार जिल्हा परिविक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हादंडाधिकारी हे
आहेत. तर समितीचे सदस्य म्हणून पोलीस
अधीक्षक, जिल्हा सत्र न्यायाधीश यांचे प्रतिनिधी, कारागृह अधीक्षक, महानगरपालिकेचे
आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कार्य महाविद्यालयाचे
प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, जिल्हा उद्योग केंद्राचे
व्यवस्थापक, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे व्यवस्थापक, महिला समुपदेशन
केंद्राचे प्रतिनिधी हे असून सदस्य सचिव म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
तर सह सदस्य सचिव हे जिल्हा परिविक्षा अधिकारी आहेत.