गुरुवार, ८ डिसेंबर, २०११
निवृत्त वेतन धारकांच्या समस्यांचे निवारणसाठी 9 डिसेंबरला बैठक
धुळे दि. निवृत्ती वेतन धारकांच्या समस्या व
अडचणीबाबत कोषागार अधिकारी, धुळे यांच्या दालनात दिनांक 9 डिसेंबर, 2011 रोजी
सकाळी 11.00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीस सर्व निवृत्ती वेतन
धारकांनी तसेच जे निवृत्त वेतन धारक इतर राज्याचे आहेत परंतु ते धुळे कोषागार
कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन घेत आहेत अशा निवृत्ती वेतन धारकांनाही या बैठकीस
उपस्थित रहावे असे आवाहन कोषागार अधिकारी प्र. शि. निंबाळकर व अप्पर कोषागार
अधिकारी गो. सा. पाटील यांनी केले आहे.
ग्रंथोत्सव-2011 व ग्रंथविक्री केंद्राचा जनतेने लाभ घ्यावा
धुळे, दि.;- दर्जेदार ग्रंथ जनतेपर्यंत
पोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे राज्यात
सर्व जिल्हयात सुरु असलेले ग्रंथोत्सव अभियान जिल्हा माहिती
कार्यालयाच्यावतीने दि. 13 ते 15 डिसेंबर, 2011 पर्यंत तीन दिवस राजर्षी छत्रपती
शाहू महाराज नाटयमंदिर येथे ग्रंथोत्सव-2011 चे आयोजन करण्यात आले
आहे. ग्रंथोत्सवातील पुढील कार्यक्रमांचा
जिल्हयातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागीय माहिती उपसंचालक प्रसाद
वसावे व जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील यांनी केले आहे.
ग्रंथोत्सवात
मंगळवार दि. 13 डिसेंबर, 2011 रोजी सकाळी 9-30 वाजता सर्वोदय कॉलनी, न्यू सिटी
हायस्कूलजवळील जिल्हा शासकीय ग्रंथालय येथून ग्रंथदिंडी जिल्हाधिकारी
प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे धुळे जिल्हा
अध्यक्ष प्रा. अनिल सोनार यांच्या हस्ते उदघाटन होणार असून, ग्रंथदिंडी स्वस्तिक
चित्र मंदिर, फुलवालाचौ आग्रारोड मागे ग. क्र. 6 येथून पारोळा रोड या मार्गाने
निघणार असून ग्रंथदिंडीचा समारोप राजर्षी
छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिर, पारोळा रोड, धुळे येथे सकाळी 11-00 वाजता
होईल. यावेळी महापौर सौ.मंजुळा गावीत,
जिल्हा पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे, महानगरपालिका आयुक्त हनुमंत भोंगळे यांची
प्रमुख उपस्थिती राहील.
ग्रंथोत्सवात दि. 13 ते 15 डिसेंबर, 2011 या
दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिर पारोळा रोड येथे होणार आहे. मंगळवार
दि. 13 डिसेंबर, 2011 रोजी सकाळी 11-00 वाजता ग्रंथजत्रेचे उदघाटन जिल्हाधिकारी
प्रकाश महाजन यांच्या हस्ते होईल. यावेळी
कार्यक्रमाचे उदघाटक व उपस्थित मान्यवरांचे विचार प्रकटन तसेच सायंकाळी 6-00 ते
रात्रौ 9-00 रंग शाहिरी कलेचा, शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील आणि मंडळी
यांचा कार्यक्रम होईल.
दि.
14 डिसेंबर, 2011 रोजी सायंकाळी 6-00 ते रात्रौ 9-00 कवी संम्मेलन आयोजित करण्यात
आले आहे, दि. 15 डिसेंबर, 2011 रोजी सायंकाळी 6-00 ते रात्रौ 9-00 सुप्रसिध्द
मराठी साहित्यिक प्रा. अनिल सोनार यांची मुलाखत मी महाराष्ट्र
वाहिनीचे संचालक चंद्रशेखर पाटील हे घेतील.
ग्रंथोत्सव स्थळी ग्रंथ विक्री केंद्रावर
हजारो महत्वपूर्ण ग्रंथांचा खजिना तीन दिवस वाचकांसाठी सकाळी 9-30 वाजेपासून
खरेदीस उपलब्ध राहील. तरी ग्रंथोत्सव कार्यक्रम व ग्रंथविक्री केंद्राचा जनतेने
लाभ घ्यावा.
गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र कायद्याचे उल्लंघन करणा-या डॉक्टरांवर टास्क फोर्स पथकाने कारवाई करावी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन
धुळे :- धुळे शहरात
आजही बाहेरचे रुग्ण येवून काही डॉक्टरांच्या मदतीने गर्भलिंग तपासणी सारखे गंभीर
प्रकार करत असून त्यांना मदत करणा-या डॉक्टरांवर कायदेशिर कारवाई करण्यासाठी
महानगरपालिका व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या टास्क फोर्स पथकाने अचानक अशा
दवाखान्यांची तपासणी करुन त्यांच्या ए फॉर्ममध्ये काही त्रुटया असल्याचे दिसले तर
सरळ त्यांच्यावर गुन्हे नोंदवावीत अशा सुचना जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी
दिल्या.
जिल्हाधिकारी
प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी जिल्हास्तरीय
सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त हनुमंत
भोंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन.
लाडीकर, जिल्हा परिषदच्या समाज कल्याण अधिकारी श्रीमती देवरे, डॉ. कुळकर्णी,
रविंद्र इंगळे, मनपाचे डॉ. डी. बी. माळी, डॉ. प्रदिप पाटील, अड.गणेश पाटील, सचिन
कुंभार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
प्रकाश महाजन यावेळी म्हणाले की, गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र (लिंग
निवडीस प्रतिबंद) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी आरोग्य विभागाने
ग्रामीण भागात कार्यशाळा घ्यावी. तसेच डॉक्टरांनी पेशंटची एमपीटी करण्यापूर्वी
आरोग्य विभागात त्याची माहिती दिली पाहिजे. त्याशिवाय एमपीठी केल्यास कायदेशिर
कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे ए फॉर्म मध्ये नोंदणी करतांना काही त्रुट्या आढळल्यास
टास्क फोर्स पथकाचे संबंधित डॉक्टरांनावर केसेस दाखल करुन त्यांचे सोनोग्राफी
सेंटर सिल करावित. तसेच काही डॉक्टर सोनोग्राफी मशिन बंद असल्याचे सांगून गर्भलिंग
निदान सारखे उद्योग करीत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात
येतील. याची संबंधित डॉक्टरांनी नोंद घ्यावी. सामाजिक स्वास्थ बिघडू नये यासाठी
डॉक्टरांनी असे कृत्य करणाऱ्याला जनतेसमोर आणून प्रशासनाला मदत करावी असेही
जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी सांगितले. तसेच असे कृत्य कोणी करत असेल तर www.amchimulgi.com यावर एस.एम.एस. करावा.
असेही आवाहन त्यांनी जनतेस केले आहे.
प्रारंभी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. लाडीकर यांनी सांगितले की, आता न्यायालयाच्या
निर्णयानेच पोर्टबेल सोनोग्राफी मशीन वापरण्यास बंदी आणली असून ते जर कोणी डॉक्टर
वापरत असतीलतो गुन्हा आहे. काही औषध विक्रेते जर गर्भपात करण्यासारखी औषधे
बेकायदेशिरपणे विक्री करत असल्याचे आढळले तर अशा औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द
करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)