धुळे :- धुळे शहरात
आजही बाहेरचे रुग्ण येवून काही डॉक्टरांच्या मदतीने गर्भलिंग तपासणी सारखे गंभीर
प्रकार करत असून त्यांना मदत करणा-या डॉक्टरांवर कायदेशिर कारवाई करण्यासाठी
महानगरपालिका व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या टास्क फोर्स पथकाने अचानक अशा
दवाखान्यांची तपासणी करुन त्यांच्या ए फॉर्ममध्ये काही त्रुटया असल्याचे दिसले तर
सरळ त्यांच्यावर गुन्हे नोंदवावीत अशा सुचना जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी
दिल्या.
जिल्हाधिकारी
प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी जिल्हास्तरीय
सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त हनुमंत
भोंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन.
लाडीकर, जिल्हा परिषदच्या समाज कल्याण अधिकारी श्रीमती देवरे, डॉ. कुळकर्णी,
रविंद्र इंगळे, मनपाचे डॉ. डी. बी. माळी, डॉ. प्रदिप पाटील, अड.गणेश पाटील, सचिन
कुंभार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
प्रकाश महाजन यावेळी म्हणाले की, गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र (लिंग
निवडीस प्रतिबंद) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी आरोग्य विभागाने
ग्रामीण भागात कार्यशाळा घ्यावी. तसेच डॉक्टरांनी पेशंटची एमपीटी करण्यापूर्वी
आरोग्य विभागात त्याची माहिती दिली पाहिजे. त्याशिवाय एमपीठी केल्यास कायदेशिर
कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे ए फॉर्म मध्ये नोंदणी करतांना काही त्रुट्या आढळल्यास
टास्क फोर्स पथकाचे संबंधित डॉक्टरांनावर केसेस दाखल करुन त्यांचे सोनोग्राफी
सेंटर सिल करावित. तसेच काही डॉक्टर सोनोग्राफी मशिन बंद असल्याचे सांगून गर्भलिंग
निदान सारखे उद्योग करीत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात
येतील. याची संबंधित डॉक्टरांनी नोंद घ्यावी. सामाजिक स्वास्थ बिघडू नये यासाठी
डॉक्टरांनी असे कृत्य करणाऱ्याला जनतेसमोर आणून प्रशासनाला मदत करावी असेही
जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी सांगितले. तसेच असे कृत्य कोणी करत असेल तर www.amchimulgi.com यावर एस.एम.एस. करावा.
असेही आवाहन त्यांनी जनतेस केले आहे.
प्रारंभी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. लाडीकर यांनी सांगितले की, आता न्यायालयाच्या
निर्णयानेच पोर्टबेल सोनोग्राफी मशीन वापरण्यास बंदी आणली असून ते जर कोणी डॉक्टर
वापरत असतीलतो गुन्हा आहे. काही औषध विक्रेते जर गर्भपात करण्यासारखी औषधे
बेकायदेशिरपणे विक्री करत असल्याचे आढळले तर अशा औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द
करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा