धुळे, दि. 23 :-
धुळे शहरात लेनिन चौकाजवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारले जाणार
असून या स्मारकाच्या प्रस्तावित जागेसाठी महानगरपालिकेने ठराव केला असून 180 चौरस
मिटर जागेत हे स्मारक उभारण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ शासनास मान्यतेसाठी सादर
केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा
सभागृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या
अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी ते बोलत
होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत
गवळी, उपवनसंरक्षक डी. यु. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे,
उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, महानगरपालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे,
नगररचनाकार एस. बी. विसपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता सी.
के. वाणी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष वाल्मिक दामोदर, सचिव
राजेंद्र सोनवणे, सदस्य साहेबराव भामरे, बलराज मगर, सुभाष जाधव, वाल्मिक जाधव, संजय मरसाळे,
बंडुनाना गांगुर्डे, हरिश्चंद्र लोंढे, महेंद्र चांदणे, गुलाम कुरेशी आदी उपस्थित
होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी
अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, वन विभाग व पोलीस अधीक्षक यांनी सिटी सर्व्हे
क्रमांक 3521 मधील 180 चौरस मिटर जागेत पुतळा उभारण्यास “ना हरकत” दिली असून सर्व
संमतीने निश्चित करण्यात आलेल्या पुतळयाचे रेखांकन सौंदर्य शास्त्रदृष्टया
जास्ती-जास्त आकर्षक बनविण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000000