मंगळवार, ९ जून, २०१५

धुळे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्राम पंचायतींचे 50 टक्के सरपंच पदांचे महिला आरक्षण सोडतीव्दारे जाहीर




धुळे, दि. 9 :- धुळे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील सन 2015 ते 2020 या कालावधीकरिता ग्राम पंचायत सरपंच पदाचे 50 टक्के  महिला आरक्षण सोडतीव्दारे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी जाहीर केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कु. गीतांजली शेखर पाटील, वय 5 वर्षे या मुलीच्या हाताने चिठ्ठया काढून महिला सरपंच पदाचे 50 टक्के आरक्षण सोडतीव्दारे नुकतेच निश्चित केले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, तहसिलदार नितीन पाटील (शिरपूर), श्रीमती गायत्री सैंदाणे (शिंदखेडा), धुळयाचे निवासी नायब तहसिलदार अरूण शेवाळे, साक्रीचे नायब तहसिलदार कैलास बिऱ्हाडे, ग्रामस्थ  आदी उपस्थित होते.
            धुळे तालुका अनुसूचित जातीसाठी  50 टक्के महिला सरपंच पदासाठी महिला आरक्षणाच्या ग्राम पंचायती नरव्हाळ, बोदगाव/वणी खु, देऊर खु, देवभाने, बेहेड तर अनुसूचित जमातीच्या ग्राम पंचायती पिंपरखेडे, सावळदे, अजनाळे, अमदड/वजीरखेडे, निमखेडी, न्याहळोद, वडगाव, लोहगड, भदाणे, सरवड, अनकवाडी, बाबरे, निकुंभे, कावठी, नवलनगर, लामकानी तर नागरीकांचा मागास प्रवर्गच्या ग्राम पंचायती अकलाड, आर्णी, उडाणे, कुंडाणे (वरखेडे), खोरदड, चिंचखेडे, नावरी, नंदाळे खुर्द, नंदाणे, बिलाडी, रतनपुरा, मळाणे, मांडळ, हेंद्रुण, सिताणे, सौंदाणे, नकाणे, दापुरा/दापुरी, गरताड आणि सर्वसाधारण करिता  असलेल्या ग्राम पंचायती अजंग/कासविहीर, कुसुंबा, कुंडाणे (वेल्हाणे), खेडे सुटे पाडा, खंडलाय खु., खंडलाय बु., जापी, तांडा मोरदड, तांडा अंचाळे, देऊर बु., धनुर/लोणकुटे, धामणगाव, धाडरी, नगाव तिसगाव/ढंढाणे/वडे, नवलाणे, बल्हाणे, बोरीस, बोरविहीर, मोरशेवडी, वडणे, वार, शिरूड, सायने, सैताळे, सोनेवाडी, नांदे पुनितपाडा, गोताणे, हडसुणी, निमगुळ, बाळापुर, इसरणे या ग्राम पंचायती 50 टक्के  महिला सरपंच पदासाठी निश्चित केल्या आहेत.
            साक्री तालुका अनुसूचित जातीसाठी  50 टक्के महिला सरपंच पदासाठी महिला आरक्षणाच्या ग्राम पंचायती दिगावे, भागापूर तर अनुसूचित जमातीच्या ग्राम पंचायती मावजीपाडा, उंबरखडवा, नवापाडा (ब्रा), धवळीविहीर (कुरे), काकशेवड, गरताड, शेवडीपाडा, खरडबारी, नांदवण, फोफादे, भडगाव व , भाडणे, ककाणी, म्हसाळे तर  नागरिकांचा मागास प्रवर्गच्या ग्राम पंचायती उभरांडी, शेणपूर, अंबापूर, कावठे, नाडसे,इंदवे, भामेर, वेहेरगाव, हट्टी खु., छाईल, सातरपाडा, कोकले आणि सर्वसाधारण करिता नवडणे, मलांजन, निळगव्हाण, ऐचाळे, सतमाने, दारखेल, सय्यदनगर, वाजदरे, अष्टाणे, धाडणे, तामसवाडी, हट्टी बु., टिटाणे, बेहेड, खुडाणे, देवजीपाडा, वसमार या ग्राम पंचायती 50 टक्के महिला सरपंच पदासाठी  निश्चित केल्या आहे.
            शिरपूर तालुका अनुसूचित जातीसाठी  50 टक्के महिला सरपंच पदासाठी महिला आरक्षणाच्या ग्राम पंचायती सावळदे, गिधाडे तर अनुसूचित जमातीच्या ग्राम पंचायती चांदपुरी, बलकुवे, तोंदे, वरूळ, वाठोडे, तऱ्हाडी त.त., जातोडे, जवखेडे तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गच्या ग्राम पंचायती तरडी, वाघाडी, भोरखेडा, भोरटेक, साकवद, अर्थे खु., बाभळदे, जामन्यापाडा, अजंदे बु., चाकडु आणि सर्वसाधारण करिता हिंगोणी बु., गरताड, आमोदे, भरवाडे, जापोरे, खर्दे बु., कुवे, करवंद, टेंभे, बाळदे, अजनाड, नांथे, उप्परपिंड, हिसाळे, भटाणे, खामखेडा प्र. था., वनावल या ग्राम पंचायती 50 टक्के महिला सरंपच पदासाठी निश्चित केल्या आहेत.
            शिंदखेडा तालुका अनुसूचित जातीसाठी  50 टक्के सरपंच पदासाठी महिला आरक्षणाच्या ग्राम पंचायती चौगाव बु., वाडी, कुंभारे प्र.न., वरसूस, सोनेवाडी तर अनुसूचित जमातीच्या ग्राम पंचायती अक्कडसे, टेंभलाय, सुलवाडे, रेवाडी, जेने कोडदे, परसोळे, टाकरखेडा, शेवाडे/रुदाणे, लंघाणे, देगाव, कदाणे, रंजाणे, पाष्टे, विटाई, मेलाणे, पढावद, वारूड आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या ग्राम पंचायती आच्छी, दाऊळ, धावडे, हुंबर्डे/वडली, कंचरपुर, खर्दे बु., साहुर, सुकवद, तामथरे, तावखेडा प्र/चावळदे/शेंदवाडे, वर्षी, विखरण, झोटवाडे, चांदगड, नवे कोडदे, कलमाडी, दसवेल तर सर्वसाधारण करिता अलाणे, बाम्हणे, चौगाव खु., चिमठावळ, दभाषी, दलवाडे प. न., दराणे, दत्ताणे, धमाणे, धांदरणे, गोराणे, हातनुर, हिसपुर, जसाणे, जातोडा, कमखेडा, लोहगाव/वसमाने, म्हळसर/वडोदे/विकवेल, पाटण, पिंप्राड, रहिमपुर, रोहाणे, सार्वे, वरूळ या ग्राम पंचायती 50 टक्के महिला सरपंच पदासाठी निश्चित केल्या आहेत.

00000

केंद्र सरकारकडून सागरी मार्ग प्रकल्पास मंजुरी

 नवी दिल्ली, 8 जून : केंद्र सरकारने आज मुंबई सागरी मार्गास मंजुरी दिली. यासंदर्भात १५ जून २०१५ पर्यंत मसुदा अध्यादेश व १५ ऑगस्ट २०१५ पर्यंत अंतिम अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
      इंदिरा पर्यावरण भवन या पर्यावरण व वने मंत्रालयाच्या इमारतीत मुंबई सागरी मार्गा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त यु.एस.मदान, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
      बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आजच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईतील सागरी मार्गाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.  या सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतूकीचा ताण मोठया प्रमाणात कमी होणार आहे. सद्या मुंबईतील ६० टक्के वाहतूक ही पश्चीम एक्सप्रेसहून होते.सागरी मार्गामुळे पश्चीम एक्सप्रेसवरील वाहतूकीचा ताण कमी होईल. या रस्त्यांमुळे पर्यावरणची हानी होणार नाही याची काळजी राज्य शासन घेईल तसेच यामार्गावर इमारत बांधकामांना परवानगी न देण्याबाबतची काळजी ही राज्य शासन घेईल.या सागरी मार्गावरील ९१ हेक्‍टर जागेत हरित क्षेत्र तयार करण्यात येणार आहे. केवळ वाहतूकीचा ताण कमी करणे आणि हरित क्षेत्र तयार करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग करू असे मुख्यमंत्री म्हणाले. सागरी मार्ग ही केंद्र सरकारने मुंबईकरांना दिलेली भेटच मी समजतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

  पर्यावरण रक्षणासाठी मुंबई सागरी मार्ग महत्वाचा : जावडेकर
देशाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने मुंबई सागरी मार्ग महत्वाचा असून नियम कायदे व पर्यावरणाची काळजी घेऊन येत्या आठवडाभरात मुंबई सागरी मार्गाबाबत प्रस्तावित अध्यादेश आणणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. त्यानंर काही सूचना आल्यात तर त्याचे निराकरण करून अंतिम अध्यादेश काढण्यात येईल. सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतुकीचा ताण आणि प्रदूषण कमी होईल आणि शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल असेही जावडेकर म्हणाले.  
    सागरी मार्गाबाबत महत्वाचे

·        सागरी मार्गाचे अंतर ३४ किलो मिटर
·        नरिमन पाँइट ते कांदिवली भागातून जाणार सागरी मार्ग
·        हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १० हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित.
·        येत्या पाच ते सहा वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्धारीत
·        या प्रकल्पाद्वारे ९१ टक्के हरित क्षेत्र निर्मितीस वाव
·        गर्दीच्या ठिकाणी होणारी गैरसोय टाळण्याकरिता सागरी मार्गात २ ठिकाणी आंतरसुमुद्री बोगदा तयार करण्यात येतील
·        या प्रकल्पातंर्गत उद्यान, हरित क्षेत्र, खेळाचे मैदान तयार करण्यात येणार
·        पश्चिम एक्सप्रेसवरील वाहतूकीचा ताण कमी होणार 

दहावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या विदयार्थ्यांचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

धुळे , दि. 9 :-   माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी  - विद्यार्थीनींचे राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे.  या सर्व विदयार्थ्यांना श्री. भुसे यांनी त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  हे विद्यार्थी भविष्यात जिल्हयांच्या लौकीकात भर घालतील, असा  विश्वासही श्री. भुसे यांनी व्यक्त केला.

0000000