शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

तूर व हरभरा पिकावरील किड व रोग नियंत्रणासाठी उपाययोजना करावी


धुळे, दि. :- राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत  तूर व  हरभरा पिकावरील किड व रोगाचे धुळे जिल्हयातील 14 स्काऊटमार्फत निरिक्षण घेण्यात आले.  या निरीक्षणाबाबतची माहिती एनआयसीपीएम, दिल्ली यांना इंटरनेटद्वारे कळविण्यात आली होती.  त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार शेतक-यांना पुढीलप्रमाणे सल्ला दिलेला आहे, अशी माहिती उपविभागीय कृषि अधिकारी, यांनी कळविले आहे.
       तूर पिकांची पेरणी केलेल्या शेतक-यांनी तुरीवरील शेंगा पोखरणा-या अळीसाठी थायमेथ्रोझाम 25  डब्ल्युजी 5 मिली/लिटर किंवा मिथील डेमेथॉन 25 ईसी @ 10 मिली पाण्यातून फवारावे.
       हरभरा पिकांची पेरणी केलेल्या शेतक-यांनी  हरभ-यावरील घाटेअळींच्या   प्रादुर्भाव टाळण्यासाठी 5 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी

खत वितरण प्रणालीची 5 डिसेंबर नंतर नोंदणी होणार नाही

धुळे, दि. :- सर्व खत वितरकांना सूचित करण्यात येते की, ऑनलाईन खत प्रणालीसाठी दि. 5 डिसेंबर, 2011 नंतर नोंदणी होणार नाही.  तरी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन राष्ट्रीय केमिकल अन्ड फर्टिलायझर्स लि. प्लॉट नं. 146, जयहिंद कॉलनी, देवपूर, धुळे येथे त्वरीत संपर्क साधावा व नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

डिसेंबर-2011 मधील लोकशाही दिन होणार नाही


धुळे, दि.2 :- राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.  त्याबाबतची आचारसंहिता दि.1 नोव्हेंबर, 2011 पासून लागू करण्यात आलेली आहे.  आचार संहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये असे शासनाने दि. 4  नोव्हेंबर, 2011 च्या पत्रान्वये कळविले आहे.
       शासनाच्या स्थायी सूचनेनुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.  उपरोक्त परिस्थितीमुळे माहे डिसेंबर-2011 मधील लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. 5 डिसेंबर, 2011 रोजी होणार नाही याची नोंद घ्यावी, असे निवासी जिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय अधिका-यांनी आपले दप्तर तहसिल कार्यालयात जमा करावे

धुळे. 1 जानेवारी 2012 या अर्हता दिनांकावर आधारीत संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत 7-धुळे शहर व 8-धुळे ग्रामीण करिता ज्या केंद्रस्तरीय अधिका-यांनी दप्तर जमा केले नाही त्यांनी तहसिल कार्यालय, धुळे येथे दप्तर तात्काळ जमा करावेत. असे तहसिलदार, धुळे यांनी कळविले आहे.