भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राष्ट्रीय मतदारयाद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमाची (National Electoral Rolls Purification and Authentication Programme) अंमलबजावणी करण्यात येत होती. या कार्यक्रमांतर्गतमतदारांकडून त्यांचे आधार क्रमांकाबाबत माहिती जमा करण्यास तसेच त्यांचे आधार क्रमांकछायाचित्र मतदार ओळखपत्रास लिंक करण्यास स्थगिती देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दि. 11 ऑगस्ट 2015 च्या आदेशानुसार भारतनिवडणूक आयोगाने दि. 13 ऑगस्ट 2015 च्या पत्रान्वये मतदारांकडून त्यांचे आधार क्रमांकगोळा करण्यास तसेच त्यांचे आधार क्रमांक छायाचित्र मतदार ओळखपत्रास लिंक करण्यासस्थगिती देण्यात आली आहे. तसेच केंद्र शासन / राज्य शासन यांच्या कोणत्याही एजन्सी/डाटासेंटर/संस्था यांच्याकडून जनतेच्या आधार क्रमांकाबाबतची माहिती गोळा करण्यात येऊ नये वत्याचा उपयोग प्रमाणिकरण व अन्य कारणासाठी करण्यात येऊ नये असेही सूचित करण्यातआले आहे.
या कार्यक्रमांतर्गत दुबार, मयत तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणिछायाचित्र मतदार ओळखपत्रातील चुका दुरुस्त करुन प्रमाणित मतदार याद्या तयार करण्याचेकाम नियमितपणे सुरु राहणार आहे. ज्या मतदारांची नावे वगळण्याचे प्रस्तावित आहे अशामतदारांच्या नावाची यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाच्याceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
याबाबतच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यातआल्याचे अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.
०००००