शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५

शिधापत्रिकाधारकांसाठी सप्टेंबर महिन्याचे अन्नधान्य परिमाण

मुंबई,दि.21 : मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गतकौटुंबिक शिधापत्रिकेवर सप्टेंबर 2015 साठी देण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे परिमाण जाहीर झाले असून ते पुढीलप्रमाणे आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम,2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीसाठी शिधापत्रिकेवर वितरित करावयाच्या धान्याचे परिमाण प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ ,3 रुपये प्रतिकिलो असे आहे. प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींसाठी सप्टेंबर महिन्यासाठी 18 हजार 22 मे. टन तांदूळ व 27 हजार 32 मे. टन गहू असे एकूण 45 हजार 54 मे. टन अन्नधान्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. 
 अंत्योदयअन्न योजनेच्या लाभार्थीसाठी शिधापत्रिकेवर एकूण 35 किलो धान्य देण्यात येणार आहे. त्यापैकी 18 किलो तांदूळ व 17 किलो गहू उपलब्ध होणार आहे. अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांसाठी या महिन्यासाठी 346 मे. टन तांदूळ व 327 मे. टन गहू असे एकूण 673 मे. टन अन्नधान्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे, असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी कळविले आहे.

०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा