धुळे, दि. 14 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे
पालक मंत्री दादाजी भुसे यांचा धुळे जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, 15 ऑगस्ट, 2015 रोजी सकाळी 7-00 वाजता मालेगांव
जि. नाशिक येथून धुळेकडे प्रयाण, सकाळी 7-45 वाजता गुलमोहर शासकीय विश्रामगृह,
धुळे येथे आगमन व राखीव, सकाळी 9-00 वाजता गुलमोहर शासकीय विश्रामगृह, धुळे येथून
जिल्हाधिकारी कार्यालय, धुळेकडे प्रयाण, सकाळी 9-05 ते 9-30 वाजता ध्वजारोहण,
राष्ट्रगीत, मानवंदना व पारितोषिक वितरण कार्यक्रम, सकाळी 9-30 ते 9-50 वाजता
चहापान व राखीव, सकाळी 9-50 ते 10-50 वाजता पाणी टंचाई, मग्रारोहयो, शेतीकर्ज
पुनर्गठन जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक, सकाळी
10-50 वाजता शेंदवड ता. साक्रीकडे प्रयाण, दुपारी 12-15 वाजता शेंदवड ता. साक्री
येथे आगमन, दुपारी 12-20 ते 12-40 वाजता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या
कामांचे जलपुजन व सिंचन विहिर कामाचा शुभारंभ व वृक्षारोपण, दुपारी 12-40 वाजता
पिंपळगांव खु. ता. साक्रीकडे प्रयाण, दुपारी 12-50 वाजता पिंपळगांव खु. ता. साक्री
येथे आगमन, दुपारी 12-50 ते 2-45 वाजता पिंपळगांव खु. येथील अनुदानित आदिवासी
आश्रमशाळेत आगमन व महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान योजना व दाखले वाटप
कार्यक्रमास उपस्थिती व राखीव, दुपारी 2-50 वाजता पिंपळगांव खु. येथून टेंभे प्र.
वार्सा (भोयाचा पाडा) ता. साक्री कडे प्रयाण, दुपारी 2-50 ते 3-00 वाजता टेंभे
प्र. वार्सा (भोयाचा पाडा) ता. साक्री येथे आगमन व मंजु गुप्ता फाऊन्डेशनतर्फे
बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधारा कामाची पहाणी व जलपुजन, दुपारी 3-15 वाजता
पिंपळनेर सटाणा मार्गे मालेगांवकडे प्रयाण.
0000000