शुक्रवार, ३ जुलै, २०१५

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याचे आवाहन

धुळे, दि. 3 :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ  (मर्या.)कार्यालयामार्फत मातंग समाज व 12 पोटजातीतील इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी या वर्गामध्ये सन 2015-16 या शैक्षणिक वर्षामध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालयाचे जिल्हा व्यवस्थापक अनिल पवार  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत (गौरव) लाभ घेण्याकरिता संबंधित जिल्हा व्यवस्थापक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) कार्यालयाकडे, धुळे  दूरध्वनी क्रमांक 02562-244131 वर संपर्क साधावा. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी अर्जा सोबत शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, 2 फोटो, जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. 

0000000

आजी,माजी सैनिकांच्या मुलांना माफत दरात वसतिगृहात प्रवेश

धुळे दि. 3 :- धुळे येथे सैनिकी मुलांचे वसतिगृह असून ते मध्यवर्ती बसस्थानकाच्या  बाजुलाच आहे. या वसतिगृहात आजी, माजी सैनिकांच्या इयत्ता आठवी पासून पुढील अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माफक शुल्क आकारुन प्रवेश दिला जातो. या वसतिगृहात राहण्याची, भोजनाची व  पाण्याची उत्तम व्यवस्था आहे. वसतिगृहात कार्यरत असलेले कर्मचारी मुख्यत्वे करुन सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले  अधिकारी व कर्मचारी असल्याने त्यांच्याकडून वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम शिस्त व मार्गदर्शन केले जाते. तरी धुळे जिल्ह्यातील माजी सैनिक व दिवंगत सैनिक, माजी सैनिक यांच्या पत्नींनी शैक्षणिक वर्ष 2015-16 मध्ये आपल्या इयत्ता आठवी किंवा त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी सैनिकी मुलांच्या वसतिगृहाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे/नंदुरबार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर (निवृत्त) सोपान डोके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

हनुमान टेकडी ते गांधी पुतळयाजवळील 9 जुलै ते 11 जुलै या कालावधीत अतिक्रमणे काढणार

धुळे, दि. 3 :- पांझरा नदीवरील धुळे बंधाऱ्याच्या कालव्यावरील महिंदळे शिवारातील हनुमान टेकडी ते गांधी पुतळयाजवळील व पुढील अतिक्रमणे दि. 9 जुलै  ते 11 जुलै, 2015 या कालावधीत काढण्याचे निश्चित केले आहे.  तरी संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

0000000

अनु. जाती/जमाती, विजाभज व नवबौध्द शेतक-यांसाठी 100 टक्के अनुदानाच्या योजना

धुळे दि. 3 :- सन 2015-16 या चालू आर्थिक वर्षासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जती व नवबौध्द  शेतकऱ्यांसाठी 100 टक्के अनुदानाने एचडीपीई पाईप,  ताडपत्रसौरपथदीप  पुरविण्याच्या वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहे.
 गरजू व पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत जातीचा दाखला, ग्रामसभेचा ठराव, 7/12 उतारा (विहीरीची नोंद असणे आवश्यक), विहिरीस पुरेसे पाणी असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र,  खाते उतारा, उत्पन्नाचा दाखला, दारिद्रयरेषेखालील कार्ड तसेच (सौरपथदीप उभारणीसाठी जागा मालकाचे संमतीपत्र) इत्यादी कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधीत ग्रामसेवकामार्फत पंचायत समितीकडे दिनांक 31 जुलै,2015 पूर्वी सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधीत पंचायत समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच समाज कल्याण समिती सभापती शांताराम रामदास राजपूत व जिल्हा समाज कल्याण अधिकारी वासुदेव पाटील  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये  केले आहे.

00000

ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकामास परवानगीची आवश्यकता

धुळे, दि. 3 :- ग्रामपंचायत क्षेत्रात बांधकाम करतांना ग्रामपंचायतीची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रिजनल प्लॅन अंमलात आहे.  तेथे बिनशेतीसाठी व बांधकामासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक केलेले आहे.  तसेच ग्रामपंचायतीला गावठाण क्षेत्रात केवळ निवासी बांधकामाकरिता बांधकाम परवानगी देता येईल.  उर्वरित औद्योगिक व वाणिज्य कारणासाठी मात्र सक्षम प्राधिकाऱ्‍यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

धुळे जिल्ह्यात कलम 144 (1) व (3 ) चे मनाई आदेश जारी

धुळे, दि. 3 :- कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (1) व (3) अन्वये प्रभारी जिल्हादंडाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दि. 2 जुलै पासून  15 ऑगस्ट, 2015 पावेतो संपूर्ण धुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
            धुळे जिल्ह्यांतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील जमिनीचे मालक, भाडेकरू अशा कोणत्याही घराचा, मालमत्तेचा वहिवाटदार, खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षक, मंदिर, गुरूव्दारा, चर्च, मस्जीद, धर्मशाळा, हॉटेल, लॉजेस आदींचे विश्वस्त, संचालक मंडळ, चालक, मालक, जमिनी-घरे खरेदी-विक्री करणारे व्यवसायी, चारचाकी, दुचाकी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यवसायी, फेरीवाले यांच्या कार्यक्षेत्रात येणारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्‍यांना अशा मालमत्तेच्या व्यवहार विवरणाची माहिती लेखी स्वरूपात देणे बंधनकारक राहील. तसेच सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्य:स्थितीत शक्य नसल्यामुळे एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद केले आहे.


दुय्यम निबंधक कार्यालयासाठी ई-निविदा सादर करण्याचे आवाहन

धुळे, दि. 2 :- नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक कार्यालयास डाटा एन्ट्री ऑपरेटरची आवश्यकता आहे.  तरी डाटा एन्ट्री ऑपरेटर पुरविण्याबाबतची ई-निविदा www.igrmaharashtra.gov.in या विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी जास्ती-जास्त नोंदणीकृत संस्था, कंपनी, फर्म यांनी ई-निविदा भरावी, असे आवाहन  मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक प्रवीण  वायकोळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

0000000

जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत विशेष मोहीम - जिल्हा उप निबंधक

धुळे, दि. 2 :- जिल्ह्यातील दि. 31 मार्च, 2015 अखेर असलेल्या 1,828 सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यासाठी 1 जुलै पासून 30 सप्टेंबर, 2015 पर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली  असून सहकारी संस्थांनी या मोहिमेचा  लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उप निबंधक रामेंद्रकुमार जोशी यांनी प्रसिध्दी  पत्रकान्वये केले आहे.
            प्रत्येक सहकारी संस्थेने सहकार विभागाच्या संकेत स्थळावर माहिती उपलब्ध करून देण्याबाबत विभागाच्या मोहिमेनंतर फारच कमी संस्थांनी नोंदणी करून आपल्या वार्षिक ताळेबंदाची माहिती भरल्याचे आढळून आले आहे.  काही नोंदणीकृत संस्थांनी आपले कामकाज थांबविलेले असावे किंवा त्यांचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच असावे, या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व उप/सहाय्यक निबंधक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व संस्थांना सर्वेक्षणाचा कार्यक्रम  दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबर, 2015 कालावधीत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांचेकडील परिपत्रकानुसार राबविण्यात येणार  आहे.
            तपासणी/सर्वेक्षणामध्ये तपासणी करण्यासाठी संस्थेचे नाव, चेअरमन, सचिव यांचे नाव व दूरध्वनी , संस्थेचा नोंदणी क्रमांक, संस्थेचे वर्गीकरण, उपवर्गीकरण, संस्थेचा नोंदणीकृत पत्ता, नोंदणीकृत पत्यावर नसल्यास इतरत्र स्थलांतरीत पत्यावर कार्यरत आहे का ? असल्यास पत्ता, संस्थेच्या नावाचा फलक आहे का ? शेवटच्या लेखापरीक्षणाचे वर्ष व वर्गवारी, वसुल भाग भांडवल, नफा-तोटा, शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक, संचालक मंडळाची निवडणूक झाल्याचा दिनांक, ही माहिती अप्राप्त असल्यास बँक खात्यावरील शेवटच्या व्यवहाराचा दिनांक, संस्थेकडे शासकीय देणे असल्यास, वित्तीय संस्थेचे येणे असल्यास, कार्यस्थगित असल्यास मालमत्तेचा तपशिल संस्थेबाबत वरील माहिती देणाऱ्या व्यक्तीची नावे व असल्यास पद, संस्थेची वर्गवार, सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची सविस्तर स्पष्ट अभिप्राय सर्वेक्षणात देण्याबाबत सूचित केले आहे. 
            बंद व कार्यस्थगित सहकारी संस्थांविरूध्द अवसायनाची कारवाई करण्यात येऊन दि. 31 डिसेंबर, 2015 पर्यंत अवसायनाचे कामकाज अंतिम करून संस्थांची नोंदणी रदृछ करण्यात येणार आहे. 

000000