धुळे, दि. 3 :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.)कार्यालयामार्फत मातंग समाज व 12
पोटजातीतील इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी या
वर्गामध्ये सन 2015-16 या शैक्षणिक वर्षामध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे
आवाहन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालयाचे जिल्हा
व्यवस्थापक अनिल पवार यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
या
शिष्यवृत्ती योजनेंतर्गत (गौरव) लाभ घेण्याकरिता संबंधित जिल्हा व्यवस्थापक, लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) कार्यालयाकडे, धुळे दूरध्वनी क्रमांक 02562-244131 वर संपर्क
साधावा. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी अर्जा सोबत शाळा सोडल्याचा दाखला,
गुणपत्रक, 2 फोटो, जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा