शुक्रवार, ३ जुलै, २०१५

धुळे जिल्ह्यात कलम 144 (1) व (3 ) चे मनाई आदेश जारी

धुळे, दि. 3 :- कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (1) व (3) अन्वये प्रभारी जिल्हादंडाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दि. 2 जुलै पासून  15 ऑगस्ट, 2015 पावेतो संपूर्ण धुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
            धुळे जिल्ह्यांतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील जमिनीचे मालक, भाडेकरू अशा कोणत्याही घराचा, मालमत्तेचा वहिवाटदार, खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षक, मंदिर, गुरूव्दारा, चर्च, मस्जीद, धर्मशाळा, हॉटेल, लॉजेस आदींचे विश्वस्त, संचालक मंडळ, चालक, मालक, जमिनी-घरे खरेदी-विक्री करणारे व्यवसायी, चारचाकी, दुचाकी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यवसायी, फेरीवाले यांच्या कार्यक्षेत्रात येणारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्‍यांना अशा मालमत्तेच्या व्यवहार विवरणाची माहिती लेखी स्वरूपात देणे बंधनकारक राहील. तसेच सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्य:स्थितीत शक्य नसल्यामुळे एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा