धुळे, दि. 2 :- जिल्ह्यातील दि. 31
मार्च, 2015 अखेर असलेल्या 1,828 सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यासाठी 1 जुलै
पासून 30 सप्टेंबर, 2015 पर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून सहकारी संस्थांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा
उप निबंधक रामेंद्रकुमार जोशी यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
प्रत्येक
सहकारी संस्थेने सहकार विभागाच्या संकेत स्थळावर माहिती उपलब्ध करून देण्याबाबत
विभागाच्या मोहिमेनंतर फारच कमी संस्थांनी नोंदणी करून आपल्या वार्षिक ताळेबंदाची
माहिती भरल्याचे आढळून आले आहे. काही
नोंदणीकृत संस्थांनी आपले कामकाज थांबविलेले असावे किंवा त्यांचे अस्तित्व केवळ
कागदोपत्रीच असावे, या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व उप/सहाय्यक निबंधक यांनी
त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व संस्थांना सर्वेक्षणाचा कार्यक्रम दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबर, 2015 कालावधीत
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांचेकडील परिपत्रकानुसार राबविण्यात
येणार आहे.
तपासणी/सर्वेक्षणामध्ये
तपासणी करण्यासाठी संस्थेचे नाव, चेअरमन, सचिव यांचे नाव व दूरध्वनी , संस्थेचा
नोंदणी क्रमांक, संस्थेचे वर्गीकरण, उपवर्गीकरण, संस्थेचा नोंदणीकृत पत्ता,
नोंदणीकृत पत्यावर नसल्यास इतरत्र स्थलांतरीत पत्यावर कार्यरत आहे का ? असल्यास पत्ता,
संस्थेच्या नावाचा फलक आहे का ? शेवटच्या लेखापरीक्षणाचे वर्ष व वर्गवारी, वसुल भाग भांडवल,
नफा-तोटा, शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक, संचालक मंडळाची निवडणूक
झाल्याचा दिनांक, ही माहिती अप्राप्त असल्यास बँक खात्यावरील शेवटच्या व्यवहाराचा
दिनांक, संस्थेकडे शासकीय देणे असल्यास, वित्तीय संस्थेचे येणे असल्यास,
कार्यस्थगित असल्यास मालमत्तेचा तपशिल संस्थेबाबत वरील माहिती देणाऱ्या व्यक्तीची
नावे व असल्यास पद, संस्थेची वर्गवार, सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची
सविस्तर स्पष्ट अभिप्राय सर्वेक्षणात देण्याबाबत सूचित केले आहे.
बंद
व कार्यस्थगित सहकारी संस्थांविरूध्द अवसायनाची कारवाई करण्यात येऊन दि. 31
डिसेंबर, 2015 पर्यंत अवसायनाचे कामकाज अंतिम करून संस्थांची नोंदणी रदृछ करण्यात
येणार आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा