धुळे, दि. 8 :- एकात्मिक बाल विकास सेवा
योजना प्रकल्प, साक्री अंतर्गत ग्रामपंचायतीच्या गावी अंगणवाडी सेविका-2, मदतनीस-9 आणि मिनी अंगणवाडी
सेविका- 1 रिक्त पदे आहेत. स्थानिक
रहिवासी (ग्रामीण) भागातील महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी
ग्रामपंचायतींना रिक्त पदे कळविण्यात आले आहे.
रिक्त पदे व अटी शर्ती पूर्ण करणा-या
ग्रामीण भागातील महिलांनी 18 जून, 2015 पर्यंत प्रकल्पस्तरावर अर्ज सादर
करावेत, असे आवाहन साक्री एकात्मिक बाल
विकास सेवायोजना प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
संबंधीत ग्रामपंचायतीच्या नोटीस
बोर्डावर अर्जाचा नमुना अटी, शर्ती नोटीस फलकावर तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक बाल विकास सेवायोजना प्रकल्प, साक्री कार्यालयात उपलब्ध आहे.
00000