शुक्रवार, १७ जुलै, २०१५

अपंग व्यक्तींच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

           धुळे, दि. 17 :- केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या अपंग व्यक्तींना  सन 2015 च्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी, अपंग व्यक्तींच्या  क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी दि. 23 जुलै, 2015 पर्यंत प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी वासुदेव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
         राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्राप्त झालेले प्रस्ताव दि. 24 जुलै 2015 पर्यंत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या पाठविण्यात येणार आहेत.  या प्रस्तावातून महाराष्ट्र राज्याच्या, सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अपंग कल्याण राज्य पुरस्कारासाठी निवड करतांना विचार करण्यात येईल.  सदरहू अर्ज www.disabilityaffairs.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे.
          केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या अपंग व्यक्तींना सन 2015 चे राष्ट्रीय पुरस्कारासाठी उत्कृष्ट कर्मचारी-स्वयंउद्योजक अपंग व्यक्ती, उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी, संस्था, अपंग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट संस्था, प्रतीथ यश व्यक्ती, अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने केलेले उत्कृष्ट संशोधन, उत्पादन, निर्माती, अपंगत्व व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी अडथळा विरहीत वातावरण निर्मिती करणारे कार्यालय, संस्था, अपंग व्यक्तींना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा, राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्य संस्था, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रौढ अपंग व्यक्ती, उत्कृष्ट कार्य करणारे अपंग बालक, उत्कृष्ट ब्रेल छापखाना, उत्कृष्ट सहजसाध्य संकेतस्थळ, अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहित करणारे उत्कृष्ट राज्य, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी अपंग व्यक्ती या गटातून पुरस्कार्थींना पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद या कार्यालयाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. 

000000

महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण सत्रासाठी इच्छुक कर्मचा-यांनी प्रवेश घ्यावा -सहसंचालक बाळासाहेब आर. घोरपडे

            धुळे, दि. 17 :- विभागीय  सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण सत्र क्र. 86 हे  दि. 20 जुलै, 2015 ते 24 सप्टेंबर, 2015 पर्यंत 50 दिवस या कालावधीत घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छुक कर्मचा-यास प्रवेश देण्यात येईल.  या प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे बंधनकारक नसून इच्छेनुसार विशिष्ट मोडयुल्सना देखील प्रवेश घेण्याची मुभा कर्मचा-यांना असेल त्या अनुषंगाने नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांनी त्यांच्याकडील  लिपीक वर्गीय कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठवावे, असे आवाहन नाशिक विभाग लेखा व कोषागारे सहसंचालक बाळासाहेब आर. घोरपडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
         या प्रशिक्षणासाठी अनुक्रमे 15 मोडयुल्सप्रमाणे निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी, धुळे, नाशिक, अहमदनगर, जळगाव व नंदुरबार  यांच्या कोषागार कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे.

00000

निवृत्तीवेतनाच्या लाभार्थ्यांनी आधार क्रमांक देण्याचे आवाहन 15 जुलै ते 31 जुलै या कालावधीत विशेष मोहीम

            धुळे, दि. 17 :- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्तीवेतन योजना अंतर्गत समाजातील वृध्द, विधवा, अपंग लाभार्थ्यांनी गावपातळीवर तलाठी, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपला आधार क्रमांक देण्याचे सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            केंद्र शासनाच्या Dierct Benefit Transfer (DBT) प्रकल्पामध्ये National Social Assistance Programme या कार्यक्रमामधील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत समाजातील वृध्द, विधवा, अपंग लाभार्थ्यांचे Aadhaar Seeding करण्यासाठी 15 जुलै ते 31 जुलै, 2015 या कालावधीत विशेष मोहीम राबवून 100 टक्के आधार सिडींग पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.  ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही आधार नोंदणी केलेली नाही त्यांनी आवश्यकता वाटल्यास आपल्या जवळील तलाठी, तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000000

जिल्हा कारागृहात विधीसेवा चिकित्सालय संपन्न


              धुळे, दि. 17 :- जिल्हा कारागृहातील बंदीजनांच्या  सुधारणा व पुनर्वसनाच्या दृष्टीकोनातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या विद्यमाने कारागृहात विधीसेवा चिकित्सालयाचे उदघाटन जिल्हा न्यायाधीश एस. एम. देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश  डी. एम. आहेर यांच्या हस्ते नुकतेच झाले.
            यावेळी जिल्हा कारागृह वर्ग-1 अधीक्षक बी. आर. मोरे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी एस. पी. भुतेकर, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे हेमंत पोतदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  या विधीसेवा चिकित्सालय कार्यक्रमात न्या. एस. एम. देशपांडे, न्या. डी. एम. आहेर यांनी मनोगत व्यक्त केले.
  या कार्यक्रमात 50 शिक्षाधिन बंदी व 100 न्यायाधिन बंदी सहभागी झाले होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारागृहातील शिक्षक संतोष जाधव आणि हेमंत पोतदार यांनी केले.  तर कारागृह अधीक्षक        बी. आर. मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.
000000