धुळे,
दि. 17 :- केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या अपंग व्यक्तींना सन 2015 च्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी, अपंग
व्यक्तींच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य
करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी दि. 23 जुलै, 2015 पर्यंत प्रस्ताव जिल्हा समाज
कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज
कल्याण अधिकारी वासुदेव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्राप्त
झालेले प्रस्ताव दि. 24 जुलै 2015 पर्यंत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य,
पुणे यांच्या पाठविण्यात येणार आहेत. या
प्रस्तावातून महाराष्ट्र राज्याच्या, सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या
अपंग कल्याण राज्य पुरस्कारासाठी निवड करतांना विचार करण्यात येईल. सदरहू अर्ज www.disabilityaffairs.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे.
केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण
विभागाच्या अपंग व्यक्तींना सन 2015 चे राष्ट्रीय पुरस्कारासाठी उत्कृष्ट
कर्मचारी-स्वयंउद्योजक अपंग व्यक्ती, उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन
अधिकारी, संस्था, अपंग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट
संस्था, प्रतीथ यश व्यक्ती, अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने
केलेले उत्कृष्ट संशोधन, उत्पादन, निर्माती, अपंगत्व व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी
अडथळा विरहीत वातावरण निर्मिती करणारे कार्यालय, संस्था, अपंग व्यक्तींना पुनर्वसन
सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा, राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाचे कार्य
करणारी राज्य संस्था, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रौढ अपंग व्यक्ती, उत्कृष्ट कार्य
करणारे अपंग बालक, उत्कृष्ट ब्रेल छापखाना, उत्कृष्ट सहजसाध्य संकेतस्थळ, अपंग
व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहित करणारे उत्कृष्ट राज्य, क्रीडा क्षेत्रात
उत्कृष्ट कार्य करणारी अपंग व्यक्ती या गटातून पुरस्कार्थींना पुरस्काराद्वारे
सन्मानित करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद या कार्यालयाकडून
प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा