धुळे, दि. 17 :- विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक
यांच्यामार्फत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण सत्र क्र. 86 हे दि. 20 जुलै, 2015 ते 24 सप्टेंबर, 2015 पर्यंत
50 दिवस या कालावधीत घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छुक
कर्मचा-यास प्रवेश देण्यात येईल. या
प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे बंधनकारक नसून
इच्छेनुसार विशिष्ट मोडयुल्सना देखील प्रवेश घेण्याची मुभा कर्मचा-यांना असेल त्या
अनुषंगाने नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्यातील
सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांनी त्यांच्याकडील
लिपीक वर्गीय कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठवावे, असे आवाहन नाशिक विभाग लेखा
व कोषागारे सहसंचालक बाळासाहेब आर. घोरपडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
या प्रशिक्षणासाठी अनुक्रमे 15
मोडयुल्सप्रमाणे निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी, धुळे,
नाशिक, अहमदनगर, जळगाव व नंदुरबार यांच्या
कोषागार कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा