धुळे,
दि. 17 :- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी
राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्तीवेतन
योजना अंतर्गत समाजातील वृध्द, विधवा, अपंग लाभार्थ्यांनी गावपातळीवर तलाठी,
अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपला आधार क्रमांक देण्याचे
सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
केंद्र
शासनाच्या Dierct Benefit Transfer (DBT) प्रकल्पामध्ये National Social
Assistance Programme या कार्यक्रमामधील
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय
विकलांग निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत समाजातील वृध्द, विधवा, अपंग लाभार्थ्यांचे
Aadhaar
Seeding करण्यासाठी 15 जुलै ते 31 जुलै, 2015 या
कालावधीत विशेष मोहीम राबवून 100 टक्के आधार सिडींग पूर्ण करण्याचे शासनाचे
निर्देश आहेत. ज्या लाभार्थ्यांनी
अद्यापही आधार नोंदणी केलेली नाही त्यांनी आवश्यकता वाटल्यास आपल्या जवळील तलाठी,
तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा