मुंबई, दि. 9 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, (इ. 10) मार्च,
2012 मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांचे शनिवार दिनांक 11
फेब्रुवारी 2012 रोजी सकाळी 10 ते सायं. 5
या वेळेत मंडळाने निर्धारित केलेल्या वितरण केंद्रावर वाटप करण्यात येणार आहे.
या निर्धारित केंद्रांवरुन विद्यार्थ्यांची प्रवेश पत्रे, विज्ञान
प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, तोंडी परीक्षेच्या कोऱ्या उत्तरपत्रिका,
गुणपत्रिका व हजेरीपत्रक आणि श्रेणी गुणपत्रिका या साहित्याचे वाटप करण्यात येणार
आहे.
सर्व माध्यमिक शाळाप्रमुखांनी
हे साहित्य घेऊन जाण्यासाठी जबाबदार व्यक्तिस (शिपायाव्यतिरिक्त) अधिकारपत्रासह
पाठविण्यात यावे आणि अधिकारपत्रामध्ये आपल्या शाळेतील येणाऱ्या प्रतिनिधीच्या
नावाचा उल्लेख करावा, असे विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ, वाशी यांनी कळविले आहे.
000