शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

गर्भलिंग तपासणी करतांना आढळल्यास संबधीत सोनोग्राफी सेटरवर कायदेशीर कारवाई करणार :-जिल्हाधिकारी प्रकाश महाजन


धुळे दि.9 :- महानगरपालीका क्षेत्रातील मोठया प्रमाणात असलेल्या सोनोग्राफी सेंटर मध्ये आजही सर्रास गर्भधारणापुर्व व प्रसवपूर्ण लिंग निदान तपासणी होत असून अशा केंद्राची ज्यावेळी मी स्वत: तपासणी करणार त्यावेळी त्रुटी आढळल्या तर मनपाच्या अधिका-यासोबतच सोनोग्राफी सेन्टरवर एफआयआर दाखल करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी नुकतेच केले आहे.
      जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली  नुकतीच जिल्हास्तरीय दक्षता पथक (Task Force) सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अशोक करंजकर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एन लाळीकर, पोलीस निरीक्षक एम.बी.पाटील,मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.माळी,डॉ.प्रदीप पाटील,पत्रकार रविंद्र इंगळे,अड.गणेश पाटील,अड.चंद्रकांत चौधरी, डॉ.एस.आर.वाणी सचिन कुंभार उपस्थित होते.
      जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यावेळी म्हणाले की,धुळे जिल्हयाचा मुलींचा रेषो राज्यात सर्वत्र कमी असून ही गंभीर बाब असुन आजही सुशिक्षीत समाजाला सांगावे लागते की,मुलापेक्षा मुली कधीही चांगल्या असतात.तरीही काही डॉक्टर गर्भलिंग तपासणी करुन समाजाची व आपली फसवणूक करीत आहेत.तरी अशानी आत्मपरिक्षण करावे सर्वत्र काही पैसा नसतो आपली समाजप्रती काही बांधीलकी आहे की नाही हे तपासून पाहिले पाहिजे.आज होणारी चूक उद्या आपल्या घरापर्यत येवू शकते तरी यांचा डॉक्टरानी विचार करावा.असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      यापुढे जिल्हास्तरीय दक्षता पथकाने सोनोग्राफी सेटरची तपासणी करतांना काटेकोरपणे तपासणी करावी थोडेशी शंका आली तर अशा केंद्राना सिल करावेत व त्यांच्यावर केसेस दाखल कराव्यात अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
      आपल्या प्रास्ताविकात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लाळीकर म्हणाले की,ग्रामीण भागात सोनोग्राफी सेंटर तपासणी करुन काही केंद्रे सील केले असून काहीवर केसेस दाखल केले आहेत.परंतु मनपा क्षेत्रातील सोनोग्राफी सेन्टर मध्ये आजही असे प्रकार होत असून याला प्रतिबध घालण्यासाठी मनपा दक्षता पथकाने योग्य कार्यवाही करुन केसेस दाखल करावेत अशा सुचना देवून तालुक्याचा आढावा घेतला.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा