शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

12 वी परीक्षा बैठक व्यवस्था पुस्तिकेचे सोमवारी वाटप


मुंबई, दि. 9 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी) फेब्रु./मार्च 2012 च्या बैठक व्यवस्थेच्या पुस्तिकेचे वाटप सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2012 रोजी  सकाळी 11 ते सायं 5 या वेळेत खालील वितरण केंद्रांवर करण्यात येणार आहे.
        मुंबई- 31, 32, 33- डॉ. ॲन्टोनिओ डिसिल्वा हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स, एस. के. बोले रोड, दादर (प.), मुंबई 28 ; ठाणे-16-       न्यू इंग्लिश स्कूल , घंटाळी रोड, नौपाडा, ठाणे ; नवी मुंबई - 16- मुंबई विभागीय मंडळ वाशी, नवी मुंबई रायगड- 17 - पेण प्रायव्हेट हायस्कूल, मु. पो. ता. पेण. या वितरण केंद्रांवर या पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार आहे.
        या जिल्ह्यातील मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी आपल्या प्रतिनिधीस अधिकार पत्रासह पाठवून  (शिपाई वगळून) बैठक व्यवस्थेची पुस्तिका घेऊन जावी,  असे विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ, वाशी यांनी कळविले आहे.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा