धुळे दि.9
:-पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार
जिल्हयात नव्याने जिल्हापातळीवर दक्षता
समिती स्थापन करण्यात आली असून त्यात
खालील शासकीय सदस्य व अशासकीय सदस्य राहणार आहेत. . अशासकीय सदस्याची नियुक्ती ही
नियुक्तीच्या दिनांकापासुन तीन वर्षापावेतो अथवा जागी त्यांचे जागी नविन अशासकीय
सदस्यांची नियुक्ती होई पावेतो यापैकी जी मुदत आधी असेल तो पावेतो राहील असेही
ओदशात म्हटले आहे.
जिल्हयाचे
पालकमंत्री हे जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष असुन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन हे उपाध्यक्ष राहणार आहेत. .
दक्षता समितीतील सदस्य पुढील प्रमाणे असून त्यात श्री.काशिनाथ पावरा,विधानसभा सदस्य
शिरपुर,श्री.योगेश रेशमा भोये,विधान सभा सदस्य साक्री, श्री.अमरिशभाई रसिकलाल
पटेल,विधानपरिषद सदस्य,तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष,
जिल्हा मध्यवर्ती सह बॅक धुळे व नंदुरबार,अप्पर जिल्हाधिकारी ,उप निबंधक तसेच
जिल्हा माहिती अधिकारी आदि सदस्य दक्षता समितीत आहेत.
दक्षता
समितीत महिला प्रतिनिधी श्रीमती.संजीवनी सिसोदे, महिला सदस्य श्रीमती.ललीता सुरेश
देसेले,सदस्य विरोधी पक्ष श्री.सतिश रामराव पाटील,सदस्य विरोधी पक्ष श्री.मगन
राजाराम पाटील,अनुसूचित जाती सदस्य श्री.हिरामण रतन बैसाणे,अनुसूचित जमाती सदस्य
श्री.शंकर हिलाल ठाकरे,दुकानदार संघटना प्रतिनिधी श्री.पंढरीनाथ सिसोदे,ग्रामीण
चळवळ प्रतिनिधी श्री.मनोहर रामचंद्र पाटील, व सदस्य सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी हे
राहतील.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा