धुळे, दि. 3 :-
ग्रामपंचायत क्षेत्रात बांधकाम करतांना ग्रामपंचायतीची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु ज्या
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रिजनल प्लॅन अंमलात आहे. तेथे बिनशेतीसाठी व बांधकामासाठी जिल्हाधिकारी
यांची परवानगी घेणे बंधनकारक केलेले आहे.
तसेच ग्रामपंचायतीला गावठाण क्षेत्रात केवळ निवासी बांधकामाकरिता बांधकाम
परवानगी देता येईल. उर्वरित औद्योगिक व
वाणिज्य कारणासाठी मात्र सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे
कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा