धुळे
दि. 3
:- सन
2015-16 या
चालू आर्थिक वर्षासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित
जाती, अनुसूचित जमाती,
विमुक्त जाती, भटक्या जमती व नवबौध्द शेतकऱ्यांसाठी 100 टक्के अनुदानाने
एचडीपीई पाईप, ताडपत्री व सौरपथदीप पुरविण्याच्या वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत.
गरजू व पात्र
लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत जातीचा दाखला,
ग्रामसभेचा ठराव,
7/12
उतारा (विहीरीची नोंद असणे आवश्यक), विहिरीस पुरेसे पाणी असलेबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे
प्रमाणपत्र, खाते उतारा, उत्पन्नाचा
दाखला, दारिद्रयरेषेखालील कार्ड तसेच
(सौरपथदीप उभारणीसाठी जागा मालकाचे संमतीपत्र) इत्यादी कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधीत
ग्रामसेवकामार्फत पंचायत समितीकडे दिनांक 31
जुलै,2015 पूर्वी
सादर करावेत. अधिक माहितीसाठी
संबंधीत पंचायत समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण
समिती सभापती शांताराम रामदास राजपूत व
जिल्हा समाज कल्याण अधिकारी वासुदेव पाटील यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा