धुळे दि. 3 :- धुळे येथे सैनिकी मुलांचे वसतिगृह असून ते मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजुलाच आहे. या वसतिगृहात आजी, माजी सैनिकांच्या इयत्ता आठवी पासून पुढील अभ्यासक्रमांचे
शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माफक शुल्क आकारुन प्रवेश दिला जातो. या वसतिगृहात राहण्याची, भोजनाची व पाण्याची उत्तम व्यवस्था आहे. वसतिगृहात कार्यरत असलेले
कर्मचारी मुख्यत्वे करुन सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी असल्याने त्यांच्याकडून
वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम शिस्त व मार्गदर्शन केले जाते. तरी धुळे जिल्ह्यातील माजी सैनिक
व दिवंगत सैनिक, माजी सैनिक यांच्या पत्नींनी शैक्षणिक वर्ष 2015-16 मध्ये आपल्या इयत्ता आठवी किंवा त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या
पाल्यांसाठी सैनिकी मुलांच्या वसतिगृहाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे/नंदुरबार
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर (निवृत्त) सोपान डोके यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा