धुळे, दि.2 :- राज्यातील सर्व नगरपरिषदा,
नगरपंचायती यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्याबाबतची आचारसंहिता दि.1 नोव्हेंबर, 2011
पासून लागू करण्यात आलेली आहे. आचार
संहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये असे शासनाने दि. 4 नोव्हेंबर, 2011 च्या पत्रान्वये कळविले आहे.
शासनाच्या
स्थायी सूचनेनुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात
लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. उपरोक्त
परिस्थितीमुळे माहे डिसेंबर-2011 मधील लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार
दि. 5 डिसेंबर, 2011 रोजी होणार नाही याची नोंद घ्यावी, असे निवासी जिल्हाधिकारी
विवेक गायकवाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा