धुळे :- राज्यात धुळे जिल्हयाचे
मुलींच्या जन्मदराचे प्रमाण अतिशय कमी असून ती आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट असून
सुशिक्षित समाजाला यासाठी चिंतन व मननाची आवश्यक असून भविष्यात मुलांना लग्नासाठी
मुलीच मिळणार नाहीत हा धोकाही समाजाने लक्षात घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन
जिल्हाधिकारी तथा पीसीपीएनडीसीचे अध्यक्ष प्रकाश महाजन यांनी आज केले.
राष्ट्रीय
ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान चाचणी
प्रतिबंध कायदा आणि Online From Filling च्या एक दिवशी कार्यशाळेचे जिल्हा शल्य
चिकित्सक धुळे, महानगरपालिका, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले
होते. कार्यशाळेचे दिप प्रज्वलन करुन जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. बी. एन.
देशपांडे यांच्या उदघाटन हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी प्रकाश
महाजन हे होते. तर प्रमुख पाहुणे मनपा आयुक्त हनुमंत भोगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, आय एम ए चे अध्यक्ष डॉ. के. एल. बोरा, निवृत्त
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुंढे, डॉ. रवि वानखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.
एन. लाडीकर, डॉ. बी. बी. माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महाले उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
प्रकाश महाजन यावेळी म्हणाले की, सुज्ञ लोकच समाजाचे मोठया प्रमाणात नुकसान करत
असून त्यांना जर कायद्याची भिती वाटत नसेल तर परमेश्वराचा कायदा त्यांना निश्चितच दंडीत करेल. बुध्दीजीव समाजाने विचार
केला पाहिजे. कारण आपण समाजाचे काही तरी देणेदार लागतो. डॉक्टरांनी पैशाचा लोभापाही समाजाचे नुकसान करु
नये,त्यांच्याकडे असे कृत्य कोणी करायला
येत असेल तर त्याला पोलीसांच्या ताब्यात द्यावे असे सांगीतले. ते पुढे म्हणाले की,
समाजातील सुज्ञ लोकांनी विपषण केल्यास त्यातून खूप काही मिळते त्यामुळे असे कृत्य
करण्यास ते धजावणार नाहीत असे अनेक उदाहरणांसह
जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगीतले.
आपल्या
उदघाटनपर भाषणात न्या. बी. एन. देशपांडे म्हणाले की, समाजातील अशा प्रतिष्ठित लोकांवर आम्हाला शिक्षा करण्याची पाळी आणू नये.
समाजात काही डॉक्टर विकृत मनोवृत्तीचे असल्यामुळे पैशाच्या हवासापाई केलेले कृत्य
समाजाला कुठे घेवून जात आहे. समाजात परमेश्वरानंतर डॉक्टराला देव समजला जातो. काही
डॉक्टर
समाजात आपली प्रतिष्ठा लोभापायी खराब करीत असून
चारित्र्यवान डॉक्टर प्रलोभनाला बळी पडणार नाही याची मला खात्री असल्याचेही
त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यावेळी म्हणाले की, समाजाला नवीन
तंत्रज्ञानाचा फायदा जरी झाला असेल तर तोटा मोठा होत आहे. तंत्रज्ञानाचा गैरफायदा
घेवून काही डॉक्टर गर्भधारणपूर्व व प्रसवपूर्व लिंग तपासणी करुन मुलींचा समाजाचा
रेषो खालावत आहेत. त्यामुळे सामाजिक सुधारणेची आवश्यकता असल्याचे त्यांनी
सांगितले.
आय.एम.ए.
चे अध्यक्ष डॉ. के. एल. बोरा यावेळी म्हणाले की राष्ट्रीय व राज्यस्तरावर आय. एम.
ए. संघटना आमच्या लोकांविरुध्दच उभी असून असे कृत्य करतांना आमचा व्यवसायिक बंधू
जर आढळला त्यावर आय.एम.ए. बंदी घालणार आहोत. असे कृत्य करणा-याला समाजापुढे
आणल्यास त्यांना आयएमए तर्फे एक लाख
रुपयाचे पारितोषिकही देण्यात येणार
असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी
मनपा आयुक्त हनुमंत भोंगळे म्हणाले की, धुळे जिल्हयाचा मुलींचा हजारामागील रेषो
883 वा आला असून ही गंभीर बाब आहे. सर्व समाजाला विचार करण्याची वेळ आली असून असे
कृत्य करणा-या डॉक्टरांना नोटीस देवून भागणार नाही तर त्यांना दंडीत केले पाहिजे.
आपली संस्कृती काय आहे हे त्यांना कळलेच नाही, पैशाच्या लोभापायी असे कृत्य
करतांना त्यांना समाजाने उघडे पाडावे. समाजात डॉक्टर, वकिल, शिक्षक,
पत्रकार,अधिकारी यांच्या मार्फत जनजागृती मोठया प्रमाणात झाली पाहिजे, असेही
त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. लाडीकर यांनी आपल्या प्रास्तविकात सांगितले की,
जिल्हयात 94 सोनोग्राफी सेन्टर असून ग्रामीण भागात 26 तर शहर भागात 68 आहे.
त्यापैकी 6 सेन्टर सील केलेले असून यापुढे अध्यक्षांच्या परवानगीने प्रत्येक
सोनोग्राफी सेंन्टरची कडक तपासणी करण्यात येणार आहे. स्त्री-पुरुषाचे प्रमाण समांतर राहण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित
डॉक्टरांनीच पुढाकार घेण्याची वेळ आली असल्याचे
सांगितले.
कार्यक्रमाच्या
पहिल्या सत्रात मेडिकल कॉन्सीलचे कार्यकारणी सदस्य डॉ. रवि वानखेडकर यांनी
पीसीपीएनडीसी कायदा व सोनोग्राफी सेन्टर चालविण्यासाठी लागणारे लायसन्स व इतर
कागदपत्रांची डॉक्टरांनी करावयाची पूर्तता
याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन वाहिदअली यांनी केले तर आभार डॉ.रवि वानखेडकर यांनी मानले.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा