धुळे, दि. 12 :- अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थी, विद्यार्थीनींना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत
पहिली व पाचवीत प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागातर्फे राबविण्यात
येते. ज्या पालकांना, पाल्यास इंग्रजी
माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश द्यावयाचा आहे.
त्यांनी प्रवेश अर्जासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प, धुळे यांच्याकडे दि. 17 जून, 2015 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन
प्रकल्प अधिकारी एस. बी. तोरणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
याअंतर्गत पाचवीसाठी प्रवेश घेऊ
इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा दि. 9 मे, 2015 रोजी घेण्यात आली
होती. या परीक्षेत विद्यार्थी संख्येचा
लक्षांक पूर्ण झालेला नाही म्हणून पाचवीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी,
विद्यार्थीनींसाठी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली व पाचवीसाठी ज्यांनी यापूर्वी
फॉर्म भरले असतील. त्यांनी पुन्हा फॉर्म
भरू नये.
साक्री तालुक्यातील मुलां, मुलींसाठी
अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे येथे शिरपूर तालुक्यातील मुलां, मुलींसाठी अनुदानित
प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, शिरपूर (चोपडा जीन) ता. शिरपूर जि. धुळे येथे व
शिंदखेडा जि. धुळे येथे दि. 20 जून, 2015 रोजी इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी परीक्षा
होणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ
इच्छिणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनी अनुसूचित जमातीचा असावा. दारिद्रय रेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक
द्यावा, पालकाची उत्पन्न कमाल मर्यादा एक लाखापर्यंत असावी. पहिलीच्या प्रवेशासाठी
विद्यार्थी-विद्यार्थीनींचे वय 5 वर्ष पूर्ण असावे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा