धुळे,
दि. 20 :- कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळे धारकांनी आपले भाडेकराराचे दस्त
मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करून सदरचे दस्त यथोचित मुद्रांकित करून
घ्यावे, असे आवाहन प्रभारी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक
जिल्हाधिकारी प्रवीण वायकोळे
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाडेकरार
नोंदणीकृत व योग्य मुद्रांकित नसल्याने शासन महसूल मोठया प्रमाणावर चुकविला जात
आहे. ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी
असे दस्त नोंदणीकृत न करता, सदरचे करारनामे, भाडेपट्टे केलेले आहे. अशा दस्ताच्या छायांकित प्रती मुद्रांक
जिल्हाधिकारी, धुळे या कार्यालयात जमा करून त्यास आवश्यक ते मुद्रांक शुल्क व दंड
भरून ते नियमित करून घ्यावेत. याबाबत उच्च
न्यायालय, मुंबई यांनी चुकविलेले मुद्रांक शुल्क वसुल करण्याबाबत कार्यवाहीचे
निर्देश दिलेले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत
त्यांच्या मालकीचे गाळे ठराविक कालावधीकरिता भाडेकरार नाम्याद्वारे वाटप केले
जातात. या करारनाम्यास महाराष्ट्र
मुद्रांक अधिनियम 1958 मधील तरतुदीनुसार आवश्यक मुद्रांक शुल्क भरून दुय्यम निबंधक
कार्यालयात करारनाम्याची रितसर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र अशा प्रकारच्या भाडेकराराची नोंदणी न
करता केवळ रूपये 100/- च्या मुद्रांकावर भाडेकरार करण्यात येऊन कृषी उत्पन्न बाजार
समितीमार्फत गाळे वाटप करण्यात येतात, असेही पत्रकात नमूद केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा