बुधवार, १५ जुलै, २०१५

कौशल्य विकास कार्यक्रमातून तरूणांना रोजगाराच्या संधी -जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख जागतिक युवा कौशल्य दिन संपन्न



  धुळे, दि. 15 :- उद्योजकांना कुशल मनुष्य बळाची गरज असते आणि कुशल मनुष्यास कामाची गरज असते.  जागतिक युवा कौशल्य दिनाच्या माध्यमातून तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी व्होकेशनल स्कील डेव्हलपमेंट नॅशनल ब्रँड अँबेसेडर राजेंद्र जाखडी, धुळे महानगरपालिका आयुक्त डॉ. नामदेव भोसले,  जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अजय पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे जी. एल. बरडे, धुळे महानगरपालिका एनवायएलएमचे खोंडे, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच. नागरगोजे, कनिष्ठ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी श्रीमती सी. ए. मांडगे, एस. एच. नाईकवाडे, सिस्टेल इन्स्टीटयुट हंसराज पाटील, शत्रुंजय करीअर ॲकॅडमीचे विष्णुकांत फाफट, अश्वदीप फाऊन्डेशनचे गुरव, शिरपूर इन्फोटेक कॉम्प्युटर्सचे रवी पाटील, प्राम्प्ट कॉम्प्युटर्सचे अजय माहेश्वरी, लघुउद्योग भारतीचे प्रकाश बागुल आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख म्हणाले की, तरूण उमेदवारांनी आणि उद्योजकांनी समन्वय साधणे आवश्यक आहे.  छोटे-छोटे रोजगाराभिमुख कोर्सेस, व्यावसायिक अभ्यासक्रम युवकांनी केले तर त्यांना चांगला रोजगार मिळेल आणि उद्योजकांनाही कुशल मनुष्यबळ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
नॅशनल ब्रँड अँबेसेडर राजेंद्र जाखडी  म्हणाले की, उमेदवार कौशल्य विकासाचे शिक्षण घेतात पण दुसराच व्यवसाय शोधतात.  त्याने मूळ जे कौशल्याचे शिक्षण घेतले आहे.  त्यातच त्याने रोजगार मिळवावा, असेही त्यांनी सांगितले. 
प्रारंभी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगार देणाऱ्या उद्योजकांकडून नियुक्तीपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  तसेच नवीदिल्ली येथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलेल्या  कौशल्य विकास कार्यक्रमाचे राष्ट्रीय धोरण व महत्व या दूरदर्शन वाहिनीवरून थेट प्रक्षेपित कार्यक्रमाचा मान्यवर, उद्योजक व तरूण उमेदवारांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सी. ए. मांडगे यांनी केले तर सूत्रसंचालन विष्णूकांत फाफट यांनी केले.  जिल्हा कौशल्य विकास, जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे श्रीमती प्रतिभा सपकाळे,          श्रीमती प्रतिभा मोरे, ए. आर. ठाकरे, पी. बी. भोई यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा