गुरुवार, ३ सप्टेंबर, २०१५

चांदणी मध्यम प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

उस्मानाबाद,दि.2:परांडा तालुक्यातील पिंपळवाडी  येथील चांदणी  मध्यम  प्रकल्पाची  पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली व त्यांनी  या प्रकल्पाची  सविस्तर  माहिती  गोदावरी विकास महामंडळाचे  कार्यकारी  संचालक सी.. बिराजदार यांच्याकडून  घेतली .
          यावेळी पालकमंत्री डॉ.दिपक सावंत,पाणी पुरवठा व स्वच्छता  मंत्री  बबनराव लोणीकरआमदार ज्ञानेश्वर चौगुले, आमदार राहुल मोटे, मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय, ‍विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, सुजीतसिंह ठाकूर , बाळासाहेब पाटील हांडोग्रीकर , जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारीअधिकारी  सुमन रावत, गोदावरी विकास महामंडळाचे  कार्यकारी संचालक सी..बिराजदार आदी मान्यवर  उपस्थीत होते .
          गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बिराजदार यांनी मुख्यमंत्री फडणवीस  यांना चांदणी  मध्यम  प्रकल्पाची सद्य:स्थीती  सांगून  हा प्रकल्प  1965-1995 या कालावधीत  90 ते 100 टक्के भरला होता. परंतु  त्यानंतर  प्रकल्पाच्या वरील  भागात  जलसंधारणाची इतर अनेक कामे झाल्याने  हा प्रकल्प  पूर्ण  क्षमतेने भरत नाही. तसेच  मागील तीन चार  वर्षात पाऊस  नसल्याने  हा प्रकल्प सद्यस्थीतीमध्ये  कोरडा  असल्याचे  सांगितले. ह्या  प्रकल्पाची पाण्याची क्षमता  23.78 दशलक्ष  घनमीटर  असून सिंचनाचे क्षेत्र 2 हजार  हेक्टर असल्याचेही बिराजदार  यांनी सांगितले.

सोनगीरीयेथील जलयुक्त कामांची पाहणी
\ राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी  जलयुक्त शिवार  अभियानांअंतर्गत  सोनगीरीता. परांडा येथील  उल्का नदीच्या सुरु असलेल्या  खोलीकरण  कामांची पाहणी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केली  व सदरील कामांबाबत  समाधान  व्यक्त  केले .
                                                          ०००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा