गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

जानेवारी 2012 पासुन निविदा व खरेदी ई-निविदा पध्दतीने मागविणार



       धुळे दि. 24 नोव्हें. :- ग्रामीण विकास विभागा अंतर्गत जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्राम पंचायत स्तरावर सर्व निविदा व खरेदी 1 जानेवारी 2012 पासुन ई-निविदा पध्दतीने मागविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ई-निविदेसाठी इच्छुक कंत्राटदारांनी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डी.एस.सी.) व ई-टोकन मिळविणे आवश्यक आहे. कंत्राटदारांनी डी.एस.सी. च्या सहाय्याने संकेतस्थळावर त्यांच्या नावांची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांनी ई-टोकन SIFY/TCS/GNFC/ e-Mudhra/Safe Srrypt ई. मान्यताप्राप्त प्रमाणित संस्थांकडून अथवा मान्यता प्राप्त डी.एस.सी. पुरवठादार संस्थेकडून प्राप्त करता येईल.
       योग्य त्या श्रेणीमध्ये नोंदणीकृत असलेले इच्छुक कंत्राटदारांसाठी http://demoeproc.nic.in या संकेत स्थळावर प्रायोगिक तत्वावर याची माहिती उपलब्ध असून प्रायोगिक तत्वावर नोंदणी सुध्दा करता येवू शकते. इच्छूक कंत्राटदारांसाठी स्वतंत्रपणे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. ई-निविदा प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी श्री. सय्यद शफी, उप अभियंता, पुणे भ्रमणध्वनी 9423471380 यांच्याशी संपर्क साधावा असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांनी कळविले आहे.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा