शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार चव्हाण निधी या विश्वस्त संस्थेमार्फत अधिस्वीकृतीधारक पत्रकार दुर्धर आजार, अपघात, आकस्मिक मृत्यूप्रसंगी आर्थिक मदत मिळण्यास पात्र राहतील.
हृदय
शस्त्रक्रिया, हृदय उपमार्ग
शस्त्रक्रिया, अन्जोप्लास्टी, मूत्रपिंड प्रतिरोपण, रक्ताचा / इतर कर्करोग
या प्रत्येक गंभीर आजारास प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे मदत केली जाईल. याशिवाय इतर
आजारांची यादी व अनुज्ञेय आर्थिक मदत याबाबतची माहिती सामान्य प्रशासन विभागाने 17
ऑक्टोबर, 2011 रोजी निर्गमित
केलेल्या शासन निर्णयात देण्यात आली आहे.
शंकरराव
चव्हाण सुवर्ण महोत्सवी कल्याण निधीमधून मदत मिळण्यासाठी मुंबई / मुंबई उपनगर
जिल्हयातील अर्जदारांनी उपसंचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क
महासंचालनालय, मादाम कामा मार्ग, राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई 400032 यांच्याकडे व उर्वरित जिल्हयातील अर्जदारांनी
संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकीत
प्रतींसह अर्ज करावा.
हा
शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा
संगणक सांकेतांक क्र. 20111017130931001 असा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा