धुळे दि. 21 :- प्रवर अधिक्षक डाकघर,धुळे विभाग धुळे 424001
द्वारा दि.27 डिसेबर,2011 रोजी दुपारी 03-00 वाजता तिमाही डाक अदालतचे आयोजन
करण्यात आले आहे.पोस्टाच्या कार्यपध्दती विषयी किंवा कामकाजबद्दल ज्या तक्रारीचे
निवारण 6 आठवडयाच्या आत झालेले नसेल व समाधान कारक उत्तर मिळाले नसेल अशा
तक्रारीची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत : टपाल,स्पीडपोस्ट,काउन्टर
सेवा,डाकवस्तु पार्सल बचत बॅक व मनी ऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या
जातील.तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा.उदा.तारीख व ज्या अधिका-यास
मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इ.संबधितानी डाकसेवेबाबतची आपली
तक्रार अधिक्षक डाकघर,धुळे विभाग धुळे 424001 यांचे नावे अतिरीक्त प्रतिसह दि.26
डिसेबर,2011 पर्यत पोहचेल अशा रितीने पाठवावी.त्यानंतर आलेल्या तक्रारीचा निपटारा
केला जाईल परंतु डाक अदालतमध्ये समावेश केला जाणार नाही.असे जी.डी.सोनार प्रवर
अधिक्षक डाकघर,धुळे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा