मुंबई, दि. 6 : आजच्या
आधुनिक काळातील पत्रकारांनी दर्पणकार
बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या पत्रकारितेचा वारसा पुढे चालवावा, असे मत
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक प्रमोद नलावडे यांनी आज येथे व्यक्त
केले.
मंत्रालय
विधिमंडळ वार्ताहर संघ व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने पत्रकार
दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात महासंचालक श्री. नलावडे बोलत होते. मंत्रालयात
मिनी थिएटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमास वार्ताहर संघाचे अध्यक्ष अनिकेत जोशी,
कार्यवाह सुरेंद्र गांगण, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक प्रल्हाद
जाधव, श्रद्धा बेलसरे आदी यावेळी उपस्थित होते.
महासंचालक श्री.
नलावडे म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकरांनी ज्या उद्दिष्टाने मराठी पत्रकारितेची
बिजे रोवली त्याच भूमिकेतून आजही वृत्तपत्रांचे काम सुरू आहे. समाजातील विविध
घटनांचे प्रतिबिंब वृत्तपत्रातून उमटत असते याच जाणिवेतून बाळशास्त्री जांभेकरांनी
पहिल्या मराठी वृत्तपत्राचे ठेवलेले 'दर्पण' हे नाव अत्यंत समर्पक होते आणि
आजही ते लागू पडते. स्वातंत्र्यपूर्व काळात बाळशास्त्री जांभेकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत समाजाच्या मत परिवर्तनासाठी पत्रकारिता
केली. त्याकाळी वृत्तपत्र हे मतपत्राची भूमिका बजावत होते, असेही त्यांनी यावेळी
सांगितले.
यावेळी
बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस महासंचालक श्री. नलावडे यांच्या हस्ते
पुष्पहार अर्पण करण्यात आला. वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री. जोशी यांनी श्री.
नलावडे यांचे स्वागत केले. किशोर आपटे यांनी
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कारकिर्दीविषयी माहिती दिली. यावेळी
महासंचालक श्री. नलावडे यांनी
विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. कार्यक्रमास पत्रकार व माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
0
0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा