मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत विविध सांस्कृतिक कार्यक्रम


मुंबई, दि. 23 : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत 26 जानेवारी रोजी परळ, वरळी, वांद्रे, आणि विक्रोळी या ठिकाणी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
            या कार्यक्रमात वरळी येथील जांबोरी मैदान येथे एकता आदिवासी विकास या संस्थेमार्फत आदिवासी नृत्य, संगिता भोसले यांचा लावणीचा कार्यक्रम होणार आहे. परळ येथील नरेपार्क मैदानात  बाळ साळसकर यांचे कोळीगीत तर मारुती शिंदे हे आदिवासी नृत्य सादर करणार आहेत. वांद्रे येथील शासकीय वसाहत येथील कार्यक्रमात मिराबाई उमप यांचे खंजिरी वादन आणि भगवान बैले-वडूजकर यांचा पोवाडा आणि लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच  विक्रोळीतील टागोर नगर येथे अंबादास महाले यांचा सोंगी मुखवट्याचा कार्यक्रम आणि शा. तळसंदेकर आणि मंडळी यांचा शाहिरीचा कार्यक्रम   होणार आहे.
          या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी केले आहे. 
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा