मुंबई, दि. 6 : जिल्हा परिषद, पंचायत
समित्या व महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2012 करिता त्या क्षेत्रातील सर्व
दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार,
औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यात कार्यरत असलेल्या मतदारांना निवडणुकीच्या
दिवशी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, अशा सूचना शासनाने
दिल्या आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती क्षेत्रात
दिनांक 7 फेब्रुवारी, 2012 रोजी तर महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी दिनांक 16
फेब्रुवारी, 2012 रोजी सुट्टी देण्यात यावी. परंतु मतदानाच्या दिवशी
अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्याप्रमाणावर नुकसान होईल अशा उद्योगातील कामगार मतदारांना
हे आदेश लागू होणार नाहीत. परंतु अशा आस्थापनेतील/उद्योगातील कामगारांना मतदानाचा
हक्क बजविण्यासाठी दोन तासाची विशेष सवलत देण्यात यावी, असेही शासनाने सूचित केले
आहे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
त्याचा संगणक सांकेतांक 20120206075945245001 असा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा