मुंबई
टर्मिनल मार्केटच्या उभारणीसाठी कृषि पणन मंडळाला राज्य शासनाने भिवंडी
तालुक्यातील बाबगाव येथे दिलेल्या 36.75 हेक्टर आर जमिनीबाबतच्या अटी व शर्तीमध्ये
अंशत: बदल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला.
जमिनींच्या किंमतीएवढे शासनाचे भागभांडवल मंडळाचा हिस्सा म्हणून
ठेवण्यात यावे, ही सध्याची अट वगळली जाणार आहे. त्याऐवजी या जमिनीकरीता प्रतिवर्षी
2.57 कोटी रूपये वार्षिक भाडे प्रकल्पाचे बांधकाम आदेश निर्गमित केल्याच्या
दिनांकापासून चौथ्या वर्षापासून आकारण्याचा आणि त्यानंतर प्रतिवर्षी भाड्यामध्ये
2.5 टक्के वाढ करण्याची अट समाविष्ट करण्यात आली आहे.
याचप्रमाणे केंद्र शासनाच्या टर्मिनल मार्केट योजनेअंतर्गत
राज्यातील 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात टर्मिनल मार्केट
उभारण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. या प्रकल्पांना मुंबई टर्मिनल
मार्केटच्या धर्तीवर महसूल विभागामार्फत जमीन उपलब्ध करुन दिली जाईल आणि त्यापोटी
खाजगी गुंतवणूकदारांकडून भाडे आकारण्यात येईल.
-----0-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा