धुळे, दि. 27
:- जलसंपदा विभागाच्या शासन निर्णय 17
जून, 2015 नुसार नाशिक पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे व मंडळातर्गत विभाग व
उपविभागाच्या नावात झालेले बदल 1 जुलै, 2015 पासून अंमलात आणण्यात आले असल्याची
माहिती धुळे मध्यम प्रकल्प विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी एका
परिपत्रकान्वये दिली.
क्र.
|
कार्यालयाचे मूळ नाव
|
नावात केलेला बदल
|
1
|
कार्यकारी अभियंता,
धुळे मध्यम प्रकल्प विभाग क्र.1, धुळे
|
कार्यकारी अभियंता,
धुळे मध्यम प्रकल्प विभाग, धुळे
|
2
|
सहाय्यक अभियंता श्रेणी-1,
मध्यम प्रकल्प उपविभाग, अक्कलपाडा
|
सहाय्यक अभियंता श्रेणी-1,
अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग, अक्कलपाडा
|
3
|
उपविभागीय अभियंता,
पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग क्र. 1, धुळे
|
उपविभागीय अभियंता,
निन्मपांझरा कालवा उपविभाग, धुळे
|
4
|
सहाय्यक अभियंता श्रेणी-1,
नाग्या साक्या कालवा उपविभाग,
शेवाडी ता. शिंदखेडा जि. धुळे
|
सहाय्यक अभियंता श्रेणी-1,
वाडी शेवाडी प्रकल्प उपविभाग,
शेवाडी ता. शिंदखेडा जि. धुळे
|
5
|
उपविभागीय अभियंता,
सोनवद कालवा उपविभाग,
सुलवाडे ता. शिंदखेडा जि. धुळे
|
उपविभागीय अभियंता,
सुलवाडे बॅरेज उपसा सिंचन उपविभाग,
सुलवाडे ता. शिंदखेडा जि. धुळे
|
6
|
उपविभागीय अधिकारी,
सोनवद धरण उपविभाग क्र. 2,
दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे
|
उपविभागीय अधिकारी,
सारंगखेडा प्रकल्प उपविभाग,
दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे
|
वरीलप्रमाणे विभाग व उपविभागाच्या
नावात बदल झाल्याने पुढील सर्व पत्रव्यवहार नवीन नावाने करण्यात यावा, असेही
परिपत्रकात नमूद केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा