धुळे दि.28 :- बोगस वैद्यकीय
व्यवसायिकांबद्दल नागरिकांची तक्रार आल्यास तसेच जे पात्रता नसतांनाही वैद्यकीय
व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर भरारी पथक नेमुन अचानकपणे कारवाई करावी अशा सूचना
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी
यांच्या दालनात बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक
कार्यवाही करण्या संदर्भात जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ
यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बैठकीस उपजिल्हाधिकारी
श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.एस.पी.भामरे, पोलीस उप अधीक्षक
(मुख्या) आय.टी.वसावे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.व्ही.पाटील,महानगरपालिका आरोग्य
अधिकारी डॉ.प्रदीप पाटील, आर.आर.बाविस्कर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन
र.पा.थेटे, सदस्य ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे ॲड.चंद्रकात येशीराव, नाशिक
विभाग उपाध्यक्ष ग्राहक पंचायतचे डॉ.योगेश हिम्मतराव सुर्यवंशी, डॉ.व्ही.एस.वानखेडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी
म्हणाले की वैद्यकीय व्यवसायिकाने ज्या पॅथीचे शिक्षण घेतले आहे.त्याच पॅथीच्या
पध्दतीने उपचार करावा,तसेच बोगस आयुर्वेद व औषधा संदर्भात वृत्तपत्रातुन प्रसिध्दी
होणा-या फसव्या जाहिराती बंद करण्याच्याही सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ
यांनी यावेळी दिल्या आहेत.त्याचप्रमाणे बोगस वैद्यकीय
व्यवसाय करणा-यावर भरारी पथकाची नेमणूक करुन अचानक धाडी घालण्याच्या सुचनाही यावेळी जिल्हाधिका-यानी दिल्यात. 00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा