धुळे, दि. 11 :- धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या 4
जुलै, 2015 च्या परिपत्रकानुसार 24 ऑगस्ट
ते 5 सप्टेंबर, 2015 या कालावधीत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, धुळे येथे विशेष मोहीम राबवून संस्थांचे,
न्यासाचे, विश्वस्तांचे फेरफार अर्ज अंतिम आदेश देऊन निकाली काढण्यात येणार
आहे. या विशेष मोहिमेचा संस्था,
न्यासाच्या विश्वस्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे विभागाचे सहाय्यक धर्मादाय
आयुक्त-1 श्रीमती व्ही. आर. मिश्रा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
ज्या संस्थेच्या/ न्यासाचे विश्वस्त
बदलाबाबत फेरफार अर्ज (मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 22
प्रमाणे ) प्रलंबित असतील अशा सर्व न्यासाचे फेरफार अर्ज 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर, 2015 या कालावधीत विशेष
मोहीम राबवून अंतिम आदेश देऊन निकाली काढण्यात येणार आहे. तरी संबंधित न्यासाचे विश्वस्तांनी सहाय्यक
धर्मादाय आयुक्त-1, धुळे विभाग, धुळे यांच्या कार्यालयात येऊन आपल्या न्यासाचे
फेरफार अर्ज वरील कालावधीत कोणत्या तारखेस नेमलेले आहेत याची माहिती घेऊन त्या तारखेस
व वेळेवर फेरफार अर्जाच्या संबंधित कागदपत्रासह आपण स्वत: अथवा वकीलासह उपस्थित
राहून सहकार्य करावे. तसेच संस्थेशी, न्यासाशी संबंधित असलेल्या
वकीलांनी ही बाब विश्वस्तांच्या निदर्शनास आणावी, असेही पत्रकात नमूद केले.
000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा