मुंबई, दि. 16 : मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात ए. पी. एल. योजनेकरिता माहे जानेवारी 2012 साठी 22,108 मेट्रिक टन गहू
व 3,622 मेट्रिक टन तांदूळ इतके नियमित नियतन मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच
गव्हाचे 11,457 मेट्रिक टन इतके अतिरिक्त नियतन मंजूर करण्यात आले आहे.
ए. पी. एल.
शिधापत्रिका धारकास एकूण 15 किलो धान्य वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये
त्यांना 10 किलो गहू व 5 किलो तांदूळ घेता येईल. एपीएल योजनेंतर्ग जानेवारी 2012
करिता परिमंडळ कार्यालयाकडून प्राप्त मागणीनुसार नियमित गहू नियतनाचे परिमंडळनिहाय
वाटप करण्यात येत असून ए. पी. एल. योजनेंतर्गत जानेवारी 2012 करिता प्राप्त तांदूळ
नियतन हे परिमंडळ कार्यालयाकडून प्राप्त मागणीच्या 29.48 टक्के इतके असल्याने
त्याच्या मागणीच्या याच टक्केवारीनुसार परिमंडळनिहाय वाटप करण्यात येणार आहे. गरजू
व पात्र शिधापत्रिकाधारक योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत व अधिकृत
शिधावाटप दुकाने कोरडी राहणार नाहीत याची दक्षता उपनियंत्रक शिधावाटप यांनी घ्यावी,
अशी सूचना नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी केली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना विहित
वेळेत अन्नधान्य पोहचण्याच्या दृष्टीकोनातून सदर योजनेचे माहे जानेवारी 2012 करिताचे
वितरण आदेश उपनियंत्रकांनी त्वरित द्यावेत आणि संलग्न संस्थांनीही या योजनेतील
अन्नधान्याची 20 जानेवारी 2012 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत 100 टक्के उचल करावी.
गोदामातून उचल
केलेले अन्नधान्य विहित मुदतीत सर्व संबंधित शिधापत्रिकाधारकांना पोहचेल यासाठी
सर्व परिमंडळ उपनियंत्रक शिधावाटप यांनी खबरदारी घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी.
अन्न महामंडळाच्या
गोदामातून गहू व तांदूळ स्वीकारताना शासनाच्या निर्देशानुसार संयुक्तपणे नमुने
घेऊन धान्याचा दर्जा तपासून तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच धान्याची उचल
करावी. अधिकृत शिधावाटप दुकानदारांनी अन्नधान्याची मागणी न नोंदविल्यास अथवा
संघटीत संस्थांनी मुदतीत 100 टक्के धान्याची उचल न केल्यास त्यांच्या विरुध्द
नियमानुसार कारवाई करावी. तसेच शिधापत्रिकाधारकास अधिकृत शिधावाटप दुकानाच्या
माध्यमातून सदर धान्याचे वाटप होत असल्याची खात्री करावी व अधिकृत शिधावाटप
दुकानांच्या नियमाप्रमाणे तपासण्या कराव्यात अशा सूचना नियंत्रक शिधावाटप व संचालक
नागरी पुरवठा, मुंबई यांनी सर्व परिमंडळातील उपनियंत्रक शिधावाटप यांना दिल्या
आहेत.
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा