मुंबई,िद. 16 : कला संचालनालयाच्या 52 व्या
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग) 2011-12 चे उद्घाटन उद्या
मंगळवार दि. 17 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे
प्रधान सचिव संजयकुमार यांच्या हस्ते होणार आहे.
ठाणे कला भवन, जुना मुंबई-आग्रा रोड, कापूरबावडी जंक्शनजवळ ठाणे
येथे होणाऱ्या या उद्घाटन समारंभास ठाणे महानगरपालिका आयुक्त आर. ए. राजीव आणि
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अभय वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
आहेत.
हे प्रदर्शन दिनांक 17 ते 22 जानेवारी, 2012 पर्यंत सकाळी 11 ते
सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याचे कला
संचालनालयाचे प्रभारी कला संचालक जी. बी. धनोकार यांनी कळविले आहे.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा