बाप म्हणे
लेकी तु गं साखरेचं पोतं. . .
परि तुझ्या
नशिबाला जामीन कोण होतं ? असं समजून मुलीच्या जन्माचा
जामीन नाकारण्याच्या वृत्तीमुळे आज सामाजिक विषमतेची दरी रुंदावतांना
दिसत आहे.
जणगणना 2011 मधून स्पष्ट झालेलं
वास्तव समजून घ्यायचे असेल तर यातील सांख्यिकीय माहितीकडे केवळ आकडेवारी म्हणून
आपल्याला आता दुर्लक्ष करता येणार नाही. यातून स्पष्ट होणारी सामाजिक विषयमतेची
दरी आणि त्यातून भविष्यात निर्माण होणारा गंभीर सामाजिक प्रश्न याकडे आपल्याला
आत्ताच लक्ष द्यावे लागेल.
काय
आहे वास्तव जाणून घेऊया !
जणगणना 2011 प्रमाणे भारताची
लोकसंख्या 1,210,193,422 इतकी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 623,724,248 तर
स्त्रियांची लोकसंख्या 586,469,174 इतकी आहे. यामध्ये 1 हजार पुरुषांमागे महिलांचे
प्रमाण 940 आहे. यातील ग्रामीण महिलांचे
प्रमाण 947 तर शहरी भागातील महिलांचे प्रमाण 926 इतके आहे.
देशामध्ये केरळ राज्य हे लिंग
गुणोत्तर सर्वात वरच्या स्थानावर असून तिथे 1 हजार पुरुषांमागे 1084 महिला आहेत.
येथे ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण 1077 आणि शहरी भागात 1091 इतके आहे. चंदिगढ
च्या ग्रामीण भागात हे प्रमाण 691 इतके कमी आहे तर दमन आणि दीव मध्ये नागरी भागात लिंग गुणोत्तराचे प्रमाण देशात
सर्वात कमी असून ते 1 हजार पुरुषांमागे 550 स्त्रिया इतके आहे. देशातील आठ
राज्यांनी ग्रामीण भागात लिंग गुणोत्तराच्या प्रमाणात घट दर्शिवली असून यामध्ये जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगढ,
महाराष्ट्र कर्नाटक, आणि लक्षद्वीप या केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे तर दादरा
नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशांने ही नागरी भागात स्त्रियांच्या प्रमाणात घट
दर्शविली आहे.
2011 च्या जनगणनेमध्ये शून्य ते सहा
या वयोगटातील बालकांच्या लिंग गुणोत्तरात लक्षवेधी घट झाल्याचे दिसून आले आहे.2001 च्या
जणगणनेनुसार देशात या वयोगटात 1 हजार
मुलांमागे 927 मुली होत्या. त्यामध्ये ग्रामीण भागातील मुलींचे प्रमाण 934 इतके
होते तर शहरी भागातील मुलींचे प्रमाण 906 इतके होते. 2011 मध्ये 1 हजार मुलांमागे
मुलींचे प्रमाण कमी होऊन 914 इतके झाले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील प्रमाण 919
तर शहरी भागातील प्रमाण 902 इतके आहे.
म्हणजेच ग्रामीण भागात या वयोगटातील
मुलींची घट ही 15 पॉईंटची आहे तर शहरी भागात ही घट 4 पॉइंटची आहे. मागील
दशकात म्हणजे 2001 ते 2011 मध्ये 1 हजार बालकांमागे दिल्ली राज्यात ग्रामीण भागात मुलींची संख्या सर्वात कमी झाली
असून ती 809 इतकी आहे तर नागालँडमध्ये नागरी क्षेत्रात या वयोगटात लिंग
गुणोत्तराचे सर्वात अधिक प्रमाण नोंदविण्यात आले असून ते 1 हजार मुलांमागे 979
इतके आहे.
महाराष्ट्राची
ग्रामीण आणि शहरी भागातील स्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला 2011 च्या
जनगणनेनुसार समोर आलेली आकडेवारी अभ्यासावी लागेल.
..2/-
उमलू द्या कळ्यांना.. :
2 :
या
जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या एकूण 11,23,72,972 इतकी आहे. यामध्ये ग्रामीण
लोकसंख्येचे प्रमाण 6,15,45,441 तर शहरी भागाची लोकसंख्या 5,08,27,531 इतकी आहे.
यामध्ये पुरुषांची लोकसंख्या 5,83,61,379 इतके आहे. ती ग्रामीण भागात 3,15,93,580
इतकी आहे तर शहरी भागात 2,67,67,817 इतकी आहे. राज्यात महिलांची एकूण लोकसंख्या
5,40, 11,575 इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांची लोकसंख्या 2,99,51,861
तर शहरी भागातील महिलांची लोकसंख्या 2,40,59,714 इतकी आहे.
दशकामध्ये
राज्याच्या लोकसंख्येत 15.99 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागाची
टक्केवारी 10.34 तर शहरी भागाची 23.67 टक्के इतकी आहे.या वाढीत पुरुषांची
टक्केवारी 15.80 तर महिलांची टक्केवारी
16.21 टक्क्यांची आहे.
राज्यात
शून्य ते सहा वयोगटात एकूण लोकसंख्या 1,28,48,375 इतकी आहे. यामध्ये ग्रामीण
भागातील लोकसंख्या 74,45,853 तर शहरी भागातील लोकसंख्या 54,02,522 इतकी आहे.
यामध्ये
मुलांची एकूण लोकसंख्या 68,22,262 इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या
39,61,420 तर शहरी भागातील लोकसंख्या 28,60,842
इतकी आहे.
यामध्ये
मुलींची एकूण लोकसंख्या 60,26,113 इतकी आहे. ग्रामीण भागातील या वयोगटातील मुलींची
लोकसंख्या 34,84,433 तर शहरी भागातील लोकसंख्या 25,41,680 इतकी आहे.
महाराष्ट्राची
एकूण साक्षरतेची टक्केवारी 82.91 टक्के इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागाचे प्रमाण
77.09 तर शहरी भागाचे प्रमाण 89.84 टक्के इतके आहे.
एकूण
साक्षरतेत पुरुषांची साक्षरतेची टक्केवारी 89.82 टक्के इतकी आहे. यामध्ये ग्रामीण
भागातील पुरुषांची साक्षरतेची टक्केवारी 86.39 तर शहरी भागातील साक्षरतेची
टक्केवारी 93.79 टक्के इतकी आहे.
एकूण साक्षरतेत महिलांची साक्षरतेची
टक्केवारी 75.48 टक्के इतकी असून यामध्ये ग्रामीण भागाचे प्रमाण 67.38 टक्के तर
शहरी भागाचे प्रमाण 85.44 टक्के इतके आहे.
राज्यातील
1991 ते 2011 लिंग गुणोत्तराचे प्रमाण
(एक हजार पुरुषांमागे महिला )
|
1991
|
2001
|
2011
|
एकूण
|
934
|
922
|
925
|
ग्रामीण
|
972
|
960
|
948
|
शहरी
|
875
|
873
|
899
|
राज्यातील 1991 ते 2011
लिंग गुणोत्तराचे प्रमाण
(शून्य ते सहा वयोगट एक हजार मुलांमागे मुली )
|
1991
|
2001
|
2011
|
एकूण
|
946
|
913
|
883
|
ग्रामीण
|
953
|
916
|
880
|
शहरी
|
934
|
908
|
888
|
3/-
उमलू द्या कळ्यांना.. :
3 :
या आकडेवारीचा
अभ्यास केला तर असे दिसून येते की, 1991 ते 2011 या कालावधीत महिलांच्या प्रमाणात
दर हजार पुरुषांमागे 934 वरून 925 इतकी घट झाली आहे तर शून्य ते सहा या वयोगटात
याच कालावधीत 1 हजार मुलांमागे 946 वरून 883 इतकी मुलींची लक्षणीय घट झाली आहे.
महाराष्ट्र : लिंग
गुणोत्तरात टॉपचे
पाच जिल्हे
अ.क्र
|
जिल्हा
|
एकूण महिलांचे
प्रमाण
|
ग्रामीण भाग
|
शहरी भाग
|
1
|
रत्नागिरी
|
1,123
|
1,146
|
1,013
|
2
|
सिंधुदूर्ग
|
1,037
|
1,046
|
981
|
3
|
गोंदिया
|
996
|
998
|
984
|
4
|
सातारा
|
986
|
993
|
955
|
5
|
भंडारा
|
984
|
984
|
982
|
महाराष्ट्र : लिंग
गुणोत्तरात सर्वात खालचे पाच जिल्हे
अ.क्र
|
जिल्हा
|
एकूण महिलांचे
प्रमाण
|
ग्रामीण भाग
|
शहरी भाग
|
1
|
मुंबई
|
838
|
---
|
838
|
2
|
मुंबई उपनगर
|
857
|
---
|
857
|
3
|
ठाणे
|
880
|
954
|
859
|
4
|
पुणे
|
910
|
927
|
899
|
5
|
बीड
|
912
|
909
|
926
|
महाराष्ट्र : लिंग
गुणोत्तरात टॉपचे पाच जिल्हे (शून्य ते
सहा वयोगट )
अ.क्र
|
जिल्हा
|
एकूण महिलांचे
प्रमाण
|
ग्रामीण भाग
|
शहरी भाग
|
1
|
गडचिरोली
|
956
|
961
|
918
|
2
|
चंद्रपूर
|
945
|
958
|
919
|
3
|
गोंदिया
|
944
|
947
|
927
|
4
|
रत्नागिरी
|
940
|
942
|
928
|
5
|
भंडारा
|
939
|
944
|
915
|
महाराष्ट्र : लिंग
गुणोत्तरात सर्वात खालचे पाच जिल्हे शून्य
ते सहा वयोगट )
अ.क्र
|
जिल्हा
|
एकूण महिलांचे
प्रमाण
|
ग्रामीण भाग
|
शहरी भाग
|
1
|
बीड
|
801
|
789
|
848
|
2
|
जळगाव
|
829
|
830
|
827
|
3
|
अहमदनगर
|
839
|
837
|
848
|
4
|
बुलढाणा
|
842
|
841
|
847
|
5
|
कोल्हापूर
|
845
|
842
|
852
|
ही आकडेवारी पाहिली तर देश आणि राज्यातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण लक्षात येते. याचा समिक्षात्मक अभ्यास केला तर पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आणि शून्य ते सहा वयोगटात मुलांच्या तुलनेत मुलींचे दर हजारी प्रमाण कमी होत असून ती चिंतेची बाब आहे.सामाजिक विषमतेची दरी आणखी वाढू द्यायची नसेल तर सावधान ! आत्ताच या गोष्टीला गांभीर्याने घेऊन पाऊले उचलण्याची गरज आहे.
असं का? याचं उत्तर शोधण्याची आता खरी
वेळ आलीय. खरचं मुला-मुलीत फरक असतो? कुठल्या क्षेत्रात मुली, मुलांच्या तुलनेत
मागे आहेत? आज किती आई-वडील
मुलांपेक्षा मुलींकडे जास्त राहातात किंवा किती मुली आई वडीलांचा
म्हतारपणाचा आधार झाल्या आहेत हे जर पाहिलं तर अनेक
लोकांकडे, कुटुंबाकडे याची उत्तरं आपल्याला नक्कीच मिळतील.
बचतगटातील महिलांपासून अवकाशात भरारी घेणाऱ्या अंतराळवीरांपर्यंत
मुलींनी विविध क्षेत्रात मिळवलेलं यश
पाहिले तर मुला-मुलीत करण्यात येत असलेला भेदभाव किती तकलादू आहे हे लक्षात येतं.
सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतल्याशिवाय पुढे जाता येत
नाही, हे आता सगळ्यांना पटू लागलं आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला स्त्री
शिक्षण आणि स्त्री समानतेची फार मोठी परंपरा लाभली आहे. क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुलेंपासून अलिकडच्या काळात मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा
यांच्यापर्यंत महिलांचे काम पाहिले तर महिलांनी कौटुंबिक विकासाबरोबर सामाजिक
विकास आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी दिलेलं योगदान लक्षवेधी
ठरतं.
अलिकडच्या काळात शासनासमवेत अनेक स्वयंसेवी संस्था सक्रीयपणे स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी योगदान
देताना दिसत आहेत. यामध्ये पहिलं ताट तिला, चला मुलींचे स्वागत करू या, नकोशी होतेय हवीशी, राखीसाठी बहीण
हवी यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. गर्भलिंग चिकित्सा
प्रतिबंधक कायद्याचीही राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. परंतु
सर्व प्रश्न कायद्याने सुटतात असं अजिबात नाही. त्यासाठी गरज आहे ती मानसिकता
बदलाची.
गावात नदी आणि घरात मुलगी असायलाच हवी अशी
जुनी जाणती माणसं नेहमी म्हणायची. नदी हे जीवनाचं, समृद्धीचं प्रतीक तर घरात मुलगी
असणं हे हासू-आसू,
फॅशन,कला-साहित्य-संस्कृती, नाविन्य, नात्यातल्या जिव्हाळ्याचा रेशीमबंध जिवंत
असल्याचं प्रतीक. म्हणनूच तर घरात मुलगी
झाली तर लई झाल्या लेकी नको म्हणू
बापा, उडूनिया जाईल तुझ्या चिमण्यांचा ताफा. . . असं सांगून ही माणसं मुलीच्या जन्माचं
स्वागत करायला लावायची. आज पुन्हा हीच संस्कृती, हाच विचार समाजमनात रुजवायचा असून
मुलीच्या जन्माचं स्वागत करायचंय. . . कळ्यांना अवेळी खुडण्याआधी पूर्ण उमलू
द्यायचंय. राष्ट्रीय बालिकादिनाच्या निमित्ताने आपण ही शपथ घेऊया !
=
= =
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा