शनिवार, ३ मार्च, २०१२

विजयराजे पुंजाजी साबळे याच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी 13 मार्च रोजी


मुंबई, दि. 2 : मुंबई मध्यवर्ती कारागृहातील मयत न्यायाधीन बंदी विजयराजे पुंजाजी साबळे हा मध्यवर्ती कारागृह, आर्थर रोड, मुंबई 11, येथे  15 जानेवारी 2012 रोजी मृत्यू पावला.
मयत आरोपी पोलिसांच्या रखवालीत मृत्यू पावला असल्याने या घटनेची दंडाधिकारीय चौकशी 13 मार्च 2012 रोजी सकाळी 11.30 वाजता कार्यकारी दंडाधिकारी मुंबई शहर यांच्या कार्यालयात, निवडणूक विभाग, तिसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई 400001 येथे होणार आहे.
या चौकशी संबंधात ज्यांना म्हणणे मांडावयाचे असेल त्यांनी लेखी निवेदने कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई शहर यांच्या समोर चौकशीच्या वेळी सादर करावीत.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा